Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

श्रीनगर येथील ग्रेनेडच्या हल्ल्यात सात गंभीर

Share

जम्मू आणि काश्मीर : येथील श्रीनगर मध्ये कडेकोट बंदोबस्त करण्यात आलं असला तरी हरीसिंह हाईट रोडजवळ काही दहशवाद्यांनी ग्रेनेडचा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सात जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था असतांनाही हा हल्ला झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. .

दरम्यान हल्ल्यानंतर येथील सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. घटनास्थळावर जम्मू-काश्मीर येथील पोलीस प्रशासन तसेच सुरक्षा बलाचे जवानही उपस्थित आहेत.

जम्मू काश्मीर मधून ३७० कलम हटविल्यानंतरही या ठिकाणी दगड फेकीच्या घटना कमी झालेल्या नाहीत. पाच ऑगस्टपासून आतापर्यंत तीनशेच्या आसपास दगडफेकीच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. दरम्यान तैनात करण्यात आलेल्या जवानांकडून येथील वातावरण सामान्य होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!