काश्मीर : दगडफेक प्रकरणातील गुन्हे मागे, मेहबूबा मुफ्तींचे आदेश

0

काश्मीरमधील 4 हजार 327 युवकांवरील दगडफेक प्रकरणातील गुन्हे हटवण्याचे आदेश जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिले आहेत.

सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार हा निर्णय सरकारच्या उच्चस्तरीय समितीच्या सुचनेनंतर घेण्यात आला आहे. त्या समितीचे अध्यक्ष पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य हे होते.

याबाबत जम्मू-कश्मीर सरकारच्या एका प्रवक्याने दिलेल्या माहितीनुसार सरकारमध्ये येताच मुख्यमंत्र्यांनी काही गुन्हे हटवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये 2008 ते 2014 पर्यंतच्या प्रकरणातील गुन्ह्यांचा समावेश आहे.

सुरुवातीच्या 2 महिन्यामध्येच मुफ्ती यांनी 634 तरुणांवरील 104 दाखल गुन्हे हटवले होते. त्यानंतर राज्यात वाढलेल्या हिंसेंमुळे गुन्हे हटविण्याची प्रक्रिया मंदावली होती. त्यानंतर आता 4 हजार 327 तरुणावरील 744 गुन्हे हटविण्यात आले आहे. ज्या युवकांवर गंभीर गुन्हे दाखल नाहीत, अशा युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे हटविण्याची मागणी मुफ्ती सरकारने केली.

गेल्या वर्षी जुलैमध्ये दगडफेक करणाऱ्या 11 हजार 500 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये सर्वात जास्त गुन्हे हे हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वानीला ठार केल्यानंतर उसळलेल्या दगड फेकीतले आहेत.

LEAVE A REPLY

*