Wednesday, April 24, 2024
Homeनगरसात फरार आरोपींच्या मुसक्या आवळ्या

सात फरार आरोपींच्या मुसक्या आवळ्या

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यात अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यातील पोलिसांना गुंगारा देऊन फरार असलेल्या सात आरोपींच्या

- Advertisement -

जामखेड पोलिसांनी मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले आहे. जामखेड पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित आलेले पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पोलिसांनी केली आहे.

जामखेडला नव्याने हजर होताच पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. याच पार्श्वभूमिवर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व जामखेड पोलीस स्टेशन यांनी सदरची मोहीम हाती घेतली आहे. त्यादृष्टीने जामखेड पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचार्‍यांचे एक भरारी पथक तयार करण्यात आले आहे.

या पथकाने केलेल्या कारवाईत आरोपी नंदकिशोर खरात व दादासाहेब खरात दोन्ही रा. हळगाव, बळीराम गणपत वाघमारे, रा. देवदैठण, एक महिला,रा. वाकी. महालिंग मोहिते ,रा. पिंपळगाव आळवा, त्रिंबक गोपाळघरे, रा. मोहरी, मनोज बबन हळनोर ,रा. मोहरी या गंभीर गुन्ह्यातील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक गायकवाड हे जामखेडला नव्याने हजर होताच तालुक्यातील अवैध धंद्यांवर छापे टाकले आहेत. यामुळे तालुक्यातील अवैध धंदा करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या