Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

रोहित पवारांची जामखेडमध्ये ‘सलून डिप्लोमसी’

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे नातू रोहित पवार शड्डू ठोकणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. रोहित यांनी मतदारसंघात संपर्कही वाढवला आहे. त्यांची जामखेड येथील ‘सलून डिप्लोमसी’ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

शरद पवारांचा नातू दाढी-कटींग तर करतच असणार. ती तर दैनंदिन क्रीया आहे. पण पवारांचा नातू जामखेडच्या एखाद्या साध्या दिसणार्‍या सलूनमध्ये दाढी करतो. येथे जमलेल्यांशी गप्पा मारतो. इच्छा, आकांक्षा, अपेक्षांबद्दल बोलतो करतो. समस्या काय आहेत, याची माहिती घेतो. याचे सामान्य माणसाला अप्रूप असणे सहाजिक आहे. नेमके तेच मंगळवारी जामखेडच्या सलूनमध्ये घडले. दाढीच्या निमित्ताने रोहित यांनी दोन कार्यकर्ते जोडून घेतले.

यावेळी त्यांनी उपस्थितांशी निवडणूकीतील उमेदवारी सोडून सर्व विषयांवर चर्चा केली. रोहित यांनी जामखेड मतदारसंघासाठी पक्षाकडे अधिकृतपणे उमेदवारी अर्ज केला आहे. लवकरच पक्षाची समिती इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. मात्र रोहित वेळ वाया न दडवता विधानसभेच्या कामाला लागले आहेत, हे त्यांच्या एकूण हालचालींवरून स्पष्ट होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!