Type to search

Featured सार्वमत

जामखेडच्या महसूल विभागात 18 पदे रिक्त

Share

जामखेड (तालुका प्रतिनिधी)- शासनामार्फत दिल्या जाणार्‍या सेवा शेतकरी, विद्यार्थी, पालकांना वेळेत मिळाव्यात म्हणून सरकारने सेवा हमी कायदा केला आहे. मात्र जामखेड तहसील कार्यालयात महसूलचे तब्बल 18 पदे एक वर्षांपासून रिक्त आहेत. यामध्ये काही सेवानिवृत्त तर काही पदोन्नती झालेले आहेत. वाढलेल्या कामाच्या तणावाचा थेट परिणाम नागरिकांवर होत आहे. सध्या गावागावांत सगळीकडे टंचाईचा प्रश्न गंभीर झाला असून महसूल विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना तत्पर रहावे लागत आहे. तालुक्यात पाण्याचे 96 टँकर तर 67 चारा छावण्या चालू आहेत. खरिपाच्या अनुदानाची विविध कामे करताना या रिक्त पदांचा मोठा दुष्परिणाम जाणवत आहे. परिणामी नागरिकांना कोणत्याही कामासाठी अनेक चकरा माराव्या लागत आहेत.

तालुक्यात खर्डा, आरणगाव, नायगाव, नान्नज, जामखेड अशी 5 महसुली मंडळे आहेत. त्यामध्ये फक्त खर्डा येथे मंडल अधिकारी नियुक्त असून उर्वरित 4 ठिकाणी महसुली मंडल अधिकार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. सर्वसाधारण अव्वल कारकून 1, पुरवठा अव्वल कारकून 1, पुरवठा निरीक्षक कारकून 1, अशी 3 कारकुनांची पदे रिक्त आहेत. तसेच लिपिकांची 4 पदे रिक्त असून यामध्ये 1 लिपीक प्रांताधिकारी कार्यालयाकडे वर्ग केला तर निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण 2, इतर मधील 1 अशी 4 लिपीक पदे रिक्त आहेत. तर 5 पैकी 1 शिपाई तहसील कार्यालय राहुरीकडे वर्ग केले आहे.

जामखेड तालुक्यातील 5 महसुली मंडलांत 31 तलाठी आहेत. मात्र त्यापैकी 5 तलाठी पदे रिक्त आहेत. एका तलाठ्यांकडे 4-5 गावे आहेत. सदर रिक्त तलाठी सध्याचे अतिरिक्त भार ज्यांच्याकडे दिला आहे. त्यांच्याकडे अगोदरच 4-5 गावे असल्याने कामात सुसूत्रता राहत नाही. परिणामी नागरिकांना तलाठी वेळेवर भेटत नाहीत. एका कामासाठी अनेक चकरा माराव्या लागत असून वेळ व पैसा वाया जात आहे. कामही होत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवडणूक कामासाठी आयोगाला लोक द्यावे लागत असल्याने बरेच कामे ठप्प राहत आहेत. तेव्हा विधानसभा निवडणुकीच्या आगोदरच रिक्त पदांवर नियुक्त्या होणे अपेक्षित आहे. यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांनी या नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान जामखेड तहसील कार्यालयाला वेगवेगळे 18 पदे रिक्त आहेत ते भरण्यासाठी वरिष्ठांकडे लेखी विनंती केली असल्याचे तहसीलदार विशाल नाईकवाडे म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!