जामखेडचे गटविकास अधिकारी पाटील निलंबित

0
अर्थपूर्ण तक्रारींची
ग्रामविकास खात्याकडून दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल जयवंत पाटील यांना ग्रामविकास विभागाने सेवेतून निलंबीत केले आहे. याबाबतचे आदेश 6 जूनला निघाले असून गटविकास अधिकारी यांच्या विरोधात शासकीय योजना राबवताना अर्थपूर्ण तक्रारी झाल्या होत्या. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघात हा प्रकार घडत असल्याने त्यांची थेट ग्राम विभागाकडे तक्रारी झाली होती. त्यानूसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
पाटील यांना निलंबित करण्यात आलेल्या आदेशात त्यांनी स्वच्छ भारत मिशन या केंद्र व राज्य सरकारच्या अत्यंत महत्वाच्या  कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केलेले आहे. पंचायत समिती पातळीवर शौचालय बांधकामासाठी निधी उपलब्ध असतांनाही 458 लाभार्थ्यांना या निधीचे वाटप केले नाही.
स्वच्छ भारत कार्यक्रमात शिल्लक असणारा अखर्चित निधी सरकार जमा केला नाही. इंदिरा आवास, रमाई आवास योजनेची कामे पूर्ण करून घेण्यात अपयशी ठरले, बीआरजीएफ आयोजन 2016 ला बंद झालेली असतांना या योजनेतील विकास कामाचे पुर्णत्वाचे दाखले, उपयोगिता प्रमाणपत्र, ग्रामपंचायतींचे बँकेतील खाते बंद केलेले नाही. यासह स्थानिक पातळीवर पाटील यांच्यावर अर्थपूर्ण आरोप झाल्याने त्यांच्या विरोधात शासनला अहवाल पाठवण्यात आला होता.
त्यानूसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे.नगर महापालिकेचे आयुक्त दिलीप गावडे यांच्या बदलीचे आदेश निघाले असून त्यांची नाशिकला अतिरिक्त आयुक्त आदिवासी भागात बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर नांदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.सी. मांगले यांची बदली झाली आहे.
मांगले यांच्या रुपाने महापालिकेला आयएएस अधिकारी मिळणार आहे. यासह राज्यात मुख्यमंत्री देंवेंद्र ङ्गडणवीस यांचे मुख्य सचिव मिलींद म्हैसकर यांची मुंबईच्या महाडाचे उपाध्यक्षपदी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली आहे.

LEAVE A REPLY

*