Type to search

जळगाव धुळे नंदुरबार

नंदुरबार येथे २० जुलै रोजी राज्यस्तरीय पर्यावरण परीषद

Share

रांजणी ता.जामनेर- निसर्ग-मित्र समिती व नंदुरबार तालुका विधायक समिती नंदुरबार तर्फे  नंदुरबार येथे २० जुलै रोजी  राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन केलेले आहे.

महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग-मित्र समिती तर्फे पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन करून पर्यावरणाचे राष्ट्रीय उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी वृक्षारोपण मोहीम , पाणी आडवा , पाणी जिरवा , जलसंधारण तसेच  एक गाव – एक होळी , प्रदूषणमुक्त दिवाळी, जलपरिषद , आदी अभियान यशस्वीपणे राबविले आहेत .पर्यावरणाच्या राष्ट्रीय उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरणप्रेमीचा गुणगौरव करणे ,पशु पक्षांची जोपासना करण्यासाठी वृक्ष बचाव रँली,शेतकरी मेळावा ,जलपरिषद ,पर्यावरण बचाव रँली अशा विविध उपक्रमाच्या  माध्यमातून सर्व सामान्य जनतेला पर्यावरणाच्या राष्ट्रीय उपक्रमात सामील करून पर्यावरणीय जन चळवळ निर्माण करून पर्यावरणवाद्यांना प्रेरणा म्हणून निसर्ग मित्र समिती व नंदुरबार तालुका विधायक समिती नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२० जुलै रोजी सकाळी १२ वा.नंदुरबार येथे  राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेत पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायत , शेतकरी , शिक्षकांना २०१८ चा  राज्यस्तरीय निसर्ग मित्र पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.

यात निफाड येथील क ग दा मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रविंद्र नारायण भवरे,चाळीसगाव तालुक्यातील ब्राम्हण शेवगे चे सरपंच सोमनाथ माळी,कोपरगाव येथील सोमैय्या विद्यालयाचे प्रा डॉ वसुदेव साळूंके, औरंगाबादचे प्राचार्य जगदीश सूर्यवंशी,मालाड चे SEO प्रमोद आडारकर,,उस्मानाबाद चे संतोष राठोड,चोपड्याचे वासुदेव महाजन,सटाणाचे प्राचार्य संजय धिवरे,पाचोऱ्याचे सौ आशा विलास राजपूत,अजंग चे माजी सरपंच सुरेश रघुनाथ पाटील पिंपळणारे दिंडोरी चे आदर्श शेतकरी चिंतामण खांदवे, अस्ताने -मालेगाव चे गो-शाळेचे -सचिव सौ मंदाकिनी प्रभाकर शिरसाठ,अंबासन -सटाण्याचे दादाजी रमेश अहिरे,वनश्री पुरस्कार विजेते गोपीचंद पाटील,सावरगाव -संगमनेरचे गोरक्ष रामनाथ पाटील,पुणे चे प्रभाकर बोरगावकर,घुमटवाळी -पार्थडी चे सचिन आहेर कुडाशी -साक्रीचे  विठ्ठल धनगर,लोनखेडे  साक्री जि प शाळेचे अरून कुवरं,प्रा.शिवाजी बैसाणे सर, प्रा सुरेश साळूंके,,नरडाणनेचे  राहुल हिंममतराव पाटी,चेापड्याचे विपुल पाटील,आदी पर्यावरण प्रेमींचा  राज्यस्तरीय पर्यावरण परिषद नंदुरबार येथील न.ता.वि.स.चे शिक्षणशास्त्र महाविद्यालय  च्या सभागृहात दि.२०-७-२०१९ शनिवार रोजी दुपारी १२-३० वा. संपन्न होणार आहे . या परिषदेची जय्यत तयारी झाली असून  यावेळी पदवीधर  आमदार मा.डॉ.सुधीरजी तांबे .जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे,आ.भैय्यासाहेब चंद्रकांत रघुवंशी,नगराध्यक्ष सौ रत्नाताई रघुवंशी,नंदुरबार तालुका विधायक समिती चे व्हा.चेअरमन मनोजभैय्या रघुवंशी,शिक्षणाधिकारी एम व्ही कदम,डीएफओ रघुवंशी,निसर्गमित्र समितीचे प्रदेशाध्यक्ष डी आर पाटील,हरियाअली ट्रस्ट चे अध्यक्ष हैदरभाई नुरानी, सामाजिक वनीकरणाचे  मुख्य वनसंरक्षक  अधिकारी, नगरचे सीआयडी विभागाचे से.नि.सुभाष सोनवणे, आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

यावेळी पर्यावरणीय विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार असून सर्व  पर्यावरण प्रेमींनी  उपस्थित राहावे असे आवाहन निसर्ग-मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे ,नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी,धुळे जिल्हाध्यक्ष डी बी पाटील ,नंदुरबार चे संपर्क प्रमुख प्राचार्य सुनिल पाटील  यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.  राज्यस्तरीय पर्यावरण परिषद यशस्वी करण्यासाठी सुधा मल्टी –स्पेशालिटी हॉस्पिटल देवपूर धुळे येथील डॉ.सुप्रिया ललित पाटील , भोकर येतील वनश्री पुरस्कार प्राप्त गोपीचंद बुधा पाटील , कृषीराज बहुद्देशीय संस्था नगावचे चेअरमन प्राचार्य.राजेंद्र रामदेव पवार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे तरी पर्यावरणप्रेमींनी या राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेला उपस्थित राहावे असे आवाहन  निसर्ग-मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, धुळे जिल्हा अध्यक्ष तथा उपशिक्षणाधिकारी डी.बी.पाटील , प्रदेश सचिव संतोषराव पाटील ,प्रदेश उपाध्यक्ष दिलीप गोविंद ,प्रदेश उपाध्यक्ष सुभाष बिंदवाल(पत्रकार) नाशिक जिल्हा अध्यक्ष नानासाहेब पाटील,  ,नगर जिल्हाध्यक्ष प्रशांत खंडागळे , नगर जिल्हाकार्याध्यक्ष नानासाहेब गुंजाळ , जळगाव जिल्हाध्यक्ष अँड विलासराव झाल्टे ,  ,धुळे जिल्हा कार्याध्यक्ष मंगलदास जगन्नाथ पाटील, धुळे जिल्हा सचिव विश्वासराव पगार , जिल्हा उपाध्यक्षएस.आर.पाटील , धुळे शहराध्यक्ष प्रा एच ए पाटील,सटाणा ,रनाळे जि.प शाळेचे आदर्श शिक्षक अमृत पाटील सर  तालुकाध्यक्ष राजेंद्र राठोड ,मालेगाव तालुका अध्यक्ष प्रा.दिपक देशमुख ,  आदीनी केले आहे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!