सुनीता गडाख यांनी केले ‘मध्यमेश्‍वर’चे जलपूजन

0
नेवासा (तालुका प्रतिनिधी)- प्रवरा नदीवरील शेवटचा असलेल्या येथील मध्यमेश्‍वर बंधारा येथे पंचायत समिती सभापती  सुनीताताई गडाख यांनी जलपूजन केले.

याप्रसंगी सविता शिंदे, ज्योती घोलप, लता गंधारे, मन्नाबी शेख, अर्चना परभणे, उषा काकडे, निर्मला म्हैसमाळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, अंबादास इरले, सचिन वढागळे, जितेंद्र कुर्‍हे, फारूक आतार, काका गायके, अल्ताफ पठाण, संदीप बेहेळे, बाळासाहेब कोकणे, राहुल देहाडराय, विशाल सुरडे, निलेश जगताप, रोहित जोशी, विल्यम गायकवाड, गणेश कोरेकर, राजू लोखंडे, सुनील जाधव उपस्थित होते.

यावेळी सौ. गडाख म्हणाल्या की 13-14 गावे अवलंबून असलेल्या मध्यमेश्‍वर बंधार्‍याच्या फळ्या कूचकामी झाल्याने बंधार्‍याच्या पाण्याची गळती जास्त प्रमाणात होत असून पाणी जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे शासनाच्यावतीने लवकरात लवकर नवीन फळ्या टाकण्यात याव्यात.

LEAVE A REPLY

*