Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

ना जल्लोष ना फटाके, शहरात सामसूम

Share

पराभवामुळे शिवसेनेत निरूत्साह

अहमदनगर (प्रतिनिधी) – अनंत अडचणींचा सामना करत राज्यात शिवसेनेचे सरकार विराजमान होण्यासाठी काही तास अवधी राहिला असून सेनापतीच्या डोक्यावर मुकुट पहावयास अधीर झालेल्या शिवसैनिकांचा राज्यभर जल्लोष सुरू आहे. नगर शहरात मात्र शिवसैनिकांनी कोणताही जल्लोष केला नाही की फटाकेेही फोडले नाहीत. आमदारकीच्या निवडणुकीत अनिल राठोड यांचा पराभव झाल्याने नगर शहर शिवसेनेत सामसूम असल्याचे चित्र दिसून आले.

नगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आणि शिवसेनेचे अनिल राठोड यांच्यात लढत झाली. त्यात जगताप यांनी बाजी मारत राठोड यांचा पराभव केला. मुख्यमंत्री पदासाठी आडून बसलेल्या शिवसेनेच्या मदतीला महाविकास आघाडी आली. शिवसेनेचे सेनापती उध्दव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे राज्यभर शिवसैनिकांचा जल्लोष सुरू आहे. नगरमध्ये असा कोणताच जल्लोष झाला नाही. ज्याच्या विरोधात लढलो त्यांच्यासोबत जल्लोष कसा करणार? या प्रश्‍नांमुळेच बहुधा नगर शिवसेनेत सामसूम असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

आ. जगताप प्रथम सत्तेच्या बाकावर
नगर शहराला प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सत्तेतील आमदार मिळाला आहे. 1995 चा अपवाद वगळता राज्यात ज्याची सत्ता त्याविरोधी आमदार नगरात आजपर्यंत मिळाला. 1995 च्या युती सरकारमध्ये अनिल राठोड पाच वर्षे सत्तेत होते. संग्राम जगताप यांची पहिली टर्म ही विरोधी बाकावरच संपली. दुसर्‍या टर्ममध्ये मात्र ते सत्तेच्या बाजूने बसणार आहेत. त्यामुळे नगर शहर विकासासाठी निधी मिळेल असा दावा जगताप समर्थक करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!