मनपा लेखापरिक्षणात 17 कोटीच्या अग्रीम रकमेवर आक्षेप

0

जळगाव । जळगाव शहर महानगरपालिकेच्या सन 2014-15 या आर्थिक वर्षाचे लेखा परिक्षण करण्यात आले होते. या लेखापरिक्षणात मनपा प्रशासनाने 17 कोटी 73 लाख 55 हजार 682 रुपयांच्या अग्रीम रकमेवर आक्षेप नोंदविण्यात आले आहे. दरम्यान 229 आक्षेपांपैकी प्रशासनाने केवळ 97 आक्षेपांची पुर्तता केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

महानगरपालिकेच्या 2014-15 आर्थिक वर्षातील लेखापरिक्षण करण्यात आले होते. लेखापरिक्षक समितीने लेखापरिक्षणानंतर 229 आक्षेप नोंदविले असुन या आक्षेपांची पुर्तता करण्यासाठी महानगरपालिकेला अर्धसमास पत्रदेखील दिले होते. त्यानुसार मनपा प्रशासनाने केवळ 97 आक्षेपांची पुर्तता केली आहे. अनियमितता आणि नियमबाह्य खर्च झाल्याचा ठपका लेखापरिक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे.

असे आहेत ठळक आक्षेप
2014-15 च्या लेखापरिक्षण अहवालात 2 कोटी 30 लाख 54 हजार 300 रुपये जादा खर्च केल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे. तसेच 17 कोटी 73 लाख 55 हजार 682 रुपयांची विविध अग्रीम रक्कम प्रलंबित असल्याने मनपाचा मोठ्या प्रमाणात निधी अडकुन पडल्याचा ठपका देखील ठेवण्यात आला आहे. मनाच्या दवाखान्यातील औषध निर्माता, परिचारिका, लॅब टेक्निशियन या पदांना जादा ग्रेड वेतन मंजुर करण्यात आल्याची नोंद देखील लेखा परिक्षण अहवालात केली आहे.

लेखापरिक्षकांनी अधिकार्‍यांची घेतली बैठक
सन 2014-15 या वर्षातील जमा खर्चाचे लेखापरिक्षण करण्यात आले होते. या लेखापरिक्षणातील नोंदविण्यात आलेल्या आक्षेपांची पुर्तता करण्यासाठी लेखापरिक्षक समितीने मनपा प्रशासनाला पत्र दिले होते. परंतू मनपा प्रशासनाने केवळ 97 आक्षेपांचीच पुर्तता केली. त्यामुळे लेखापरिक्षण समितीतील अधिकारी महापालिकेत आले होते. त्यांनी अधिकार्‍यांची बैठक घेवून आक्षेपांची पुर्तता करण्याची सूचना दिली.

LEAVE A REPLY

*