Type to search

जळगाव

टंचाईवर जि.प.ची आज सभा गाजणार

Share

जळगाव । जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवार दि.17 रोजी दुपारी 2 वाजता छत्रपती शाहू महाराज सभागृहात जि.प.अध्यक्षा ना. उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेच्या पटलावर 33 विषय ठेवण्यात आलेले आहे. यात पाणीटंचाई, मनरेगाची कामे आदी विषयावर सभा गाजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच आंतर जिल्हा बदल्यांसह शिक्षकांच्या बदल्यांना उशिर झालेला आहे. शिक्षक बदल्यांचा विषय गाजण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेचा बंद असलेला छापखाना सुरु करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली असून मात्र निधी तोकडा दिला जात आहे. त्यामुळे छापखानाही सर्व साधारण सभेत कळीचा मुद्दा ठरणार आहे. सामूहिक पाणीपुरावठा योजना बांधकाम विभागाकडील कामांची निविदा, लघुसिंचन विभागातील कामे तसेच जिल्हा परिषदेच्या अनेक विभागात सोलर पॅनल, इन्व्हर्टर नादुररुस्त आहेत. त्यांच्या दुरुस्तीच्या कामाबद्दल निष्काळजीपणा केला जात आहे. इलेक्ट्रीक विभागात दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात रखडलेली आहेत. यासंदर्भात जि.प. अध्यक्षा ना. उज्ज्वला पाटील यांनी संबंधित विभागातील अभियंत्यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. हा प्रश्न सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यकता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!