Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

जळगाव : हायटेक प्रचाराला फाटा देत उमेदवाराचा बैलगाडीने प्रचार

Share

नाशिक : विधानसभेचे वार जोरदार वाहू लागलं असून राज्यभर प्रचाराचा धुरळा सुरु आहे. अशातच प्रचाराच्या संकल्पना बदलत चालल्या असताना जळगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष असणाऱ्या उमेदवाराने चक्क बैलगाडीवरून प्रचार केला. यामुळे जिल्हाभरात हा अपक्ष उमेदवार कौतुकाचा विषय ठरला.

दरम्यान गेल्या सहा दिवसांपासून राज्यभर विविध पक्षांचा प्रचार सुरु असून वेगवेगळ्या माध्यमातून हा प्रचार करण्यावर भर दिला जात आहे. एकूणच प्रचार म्हटला सभा, रॅली याद्वारे प्रचार केला जातो. आता तर प्रचाराची संकल्पना बदलून हायटेक प्रचार व्हायरल होत आहे. म्हणजेच सोशल मीडियावर हा प्रचार होत असतो.

परंतु या सगळ्या गोंधळात जळगाव येथील एका अपक्ष उमेदवाराने चक्क बैलगाडीवर प्रचार करणाया सुरवात केली आहे. सोबत माईक ठेवत स्वतःच स्वतःचा प्रचार करतांना हा उमेदवार दिसून येत आहे. यामुळे एकीकडे हायटेक प्रचाराची धूम असतांना या अपक्ष उमेदवारांच्या बैलगाडी प्रचार सर्वांच्या कौतुकाचा विषय झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!