बांभोरीतील बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्त्या

0
जळगाव । बांभोरी येथील 12 वीच्या विद्यार्थींनीने विषारीद्रव्य सेवन करून आत्महत्या केल्याची घटना दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या विद्यार्थींनीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता, तिला मयत घोषित करण्यात आले. ज्योती दिपक पाटील वय 19 असे मयत तरुणीचे नाव आहे.

ज्योती हीचे बारावीचे पेपर असल्याने दुपारी ती पेपरला गेली होती. दुपारी तिची आई रत्नाबाई ही बैठकीला गेली होती तर तिचे वडील दिपक पाटील हे शेतात गेले होते. त्यामुळे ज्योती घरात एकटी होती. यावेळी तीने काहीतरी विषारी द्रव्यसेवन करून आत्महत्या केली. दुपारी तिची आई घरी आल्यानंतर दरवाजा आतून लावलेला दिसून आला.

ज्योती हिने दरवाजा न उघडल्याने आईने आरडाओरड केली. त्यानंतर शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला असता, ज्योती हिने विषारी द्रव्यसेवन केल्याचे दिसून आले. तिला लगेचच धरणगाव प्राथमिक रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला जळगावी दाखल करण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात तिला मयत घोषित करण्यात आले. तिच्या पश्चात आई,वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. दरम्यान ज्योतीने आत्महत्याचे कारण समजून आले नाही.

LEAVE A REPLY

*