रावेर तालुक्यात थंडीचा जोर वाढल्यामुळे केळीला ‘चरका’चा विळखा!

0
रावेर । तालुक्यात थंडीने काहूर केले आहे.यंदा अनेक वर्षाच थंडीने रेकॉर्ड मोडले असून.तालुक्यातील तब्बल 20 हजार हेक्टर क्षेत्रावरील केळीची थंडीमुळे अन्नद्रव्ये शोषण्याची प्रक्रीया मंदावल्याने या बागांना चरका लागण होऊन, हिरवेगार केळी बागा पिवळ्याधम झाल्या आहे.

चरक्याने केळी बागा उद्ध्वस्त होण्याची भीती उत्पादकात वाढल्याने जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभाग व केळी संशोधन केंद्राच पथक रावेरात तैनात झाले असून, ठिकठिकाणच्या केळी बागांची पाहणी करुन उपाययोजना आखण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करत आहे.

गुरुवारी केळी संशोधन केंद्राचे जळगाव येथील के.बी.पवार,तालुका अधिकारी एस.एस.पवार,पाल मंडळ अधिकारी एस.आर साळुंके,सावदा मंडळ अधिकारी एस.पी.गायकवाड,चंपालाल वारडे,पी.जी.पाटील,नीलकंठ रुले,राजपूत यांनी सावदा,वाघोदा बु,चिनावल,कुंभारखेडा,उटखेडा,भाटखेडा,या ठिकाणी बागांची पाहणी केली,दरम्यान केळी संशोधकांनी, हवेच्या थंड झोतापासून केळीचे संरक्षण करण्यासाठी चारही बाजूने शेडनेट लावावीत,रात्री चारही बाजूने ओला व सुका कचरा एकत्र जाळून धूर निर्माण करावा,बागांना पाणी देणे बंद न करता सुरु ठेवावे,

रात्री किंवा पहाटे पाणी द्यावे,यामुळे तापमान 2 ते 3 डिग्री तापमानात वाढ होते.बागेत पाणी साठवून राहणार नाही याची काळजी घ्यावी,वाफसा स्थिती कायम ठेवावी,खोडा भोवती 50 ग्रम निंबोळी पेंड टाकावी,बागेत 19;19;19 विद्राव्य खतांची 75 ग्रम प्रती 15 लिटर पाणी यानुसार फवारणी करावे,चीलेटेड स्वरूपातील सुष्म अन्नद्रव्य 200 ग्रम प्रती 1000 खोडांना ठिंबक द्वारे द्यावेत.

पोटेश कमी पडणार नाही,मोठ्या बागात प्रती एक हजार खोडांना 5 किलो युरिया,3 किलो अमोनिया सल्फेट,व 5 किलो पोटेश,4-5 दिवसाच्या अंतराने द्यावे,घडाना स्क्रटीग बॅग लावावी,तसेच करपा प्रादुर्भाव होवू नये यासाठी प्रोटोकॅॅनीझोल 1 मिली प्रती ली,मिनरल ऑईल 10 मि.ली.पाण्यात घेवून फवारणी करावी,बागेची सर्वसाधारण स्वच्छता राखावी अशा उपाय योजना करण्याचे तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी शेतकर्यांना आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

*