Type to search

maharashtra जळगाव

वॉर्डनिहाय समस्यांची आमदारांकडून दखल!

Share
जळगाव । ‘दै.देशदूतच्या फोकस’ या मालिकेची नगरसेवकांसह आमदार सुरेश भोळे यांनीही गंभीर दखल घेतली असून शुक्रवारी त्यांनी प्रभाग क्र.15 मध्ये भेट देवून होत असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी रहिवाशांना दिले. याबाबत दै.देशदूतच्या टीमने नुकतेच वार्डातील समस्यांना वाचा फोडली होती.

विविध भागात चोकअप झालेल्या गटारी, तसेच परिसरातील होत नसलेली साफसफाई आदी समस्या होत्या. काही ठिकाणी गटारीवर दुकानधारकांनी अतिक्रमण केले होते. तेथे अतिक्रमण दूर करुन गटारीतील घाण काढण्यात आली. यावेळी परिसरातील नगरसेवक प्रशांत नाईक यांचेसह इस्माईल खान, रहिमभाई, सुलतानाबी शेख, लताबाई कुडी, असलम कुरेशी व इतर नागरिक उपस्थित होते. दै.देशदूत करीत असलेल्या वार्डनिहाय समस्यांचा मोठ्या प्रमाणावर इफेक्ट होवू लागला असून या कामाचे कौतुक जनमाणसांकडून केले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!