Type to search

maharashtra जळगाव

रस्ते विकासात पर्यावरणाच्या समतोलाकडे कानाडोळा!

Share
जळगाव । जिल्ह्यात काही महिन्यापूर्वीच महामार्गाचे ‘नही’कडे हस्तांतरण करण्यात येवून नुतनीकरणाचे भिजत घोंगडे अजुन पडलेले आहे तर दुसरीकडे आंतरजिल्हा मार्ग व राज्य मार्गांचे ठिकठिकाणी विस्तारीकरणाच्या माध्यमातुन विकासाकडे वाटचाल सुरू आहे. या विस्तारीकरणाचे कार्य प्रगतीपथावर असले तरी निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल राखण्यात मात्र शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहरातील अजिंठा चौफुलीपासून ते औरंगाबाद तसेच शिरसोली नाक्यापासून ते चांदवड असे दोन महामार्गांचे चौपदरीकरणाचे कार्य गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. विस्तारीकरणांतर्गत आतापर्यंत या दोन्ही रस्त्यांच्या दुतर्फा असलेली सुमारे 8 हजारांच्यावर निंब, पिंपळ, वड असे अनेक प्रकारची 70 ते 100 वर्ष वयोमान असलेली डेरेदार घनदाट अशी सावलीयुक्त सर्वच झाडे काढण्यात आली. विस्तारीकरणासाठी ही झाडे काढणे आवश्यक असली तरी ते जुने वृक्ष काढण्यापूर्वीच एक दोन वर्ष अगोदर नवीन झाडांचे रोपण करणे आवश्यक होते.

सद्यस्थितीत विस्तारीत रस्त्यांच्या दुतर्फा 4 ते 5 फुट उंचीची रोपे लावण्यात आली आहेत. त्या रोपांचे संवर्धन जतन करणे व वेळोवेळी पाणी देणे ही सर्व जबाबदारी संबंधित ठेकेदारांची आहे, असे सार्वजनिक विभागामार्फत सांगण्यात आले असले तरी ठेकदारांकडून या रोपांचे संवर्धन केले जात नसल्याचेच चित्र दिसून येत आहे. शहरातील शिरसोली नाक्यापासून ते पाचोरा पर्यतचा राज्य मार्ग थेट चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गाला मिळणार आहे. या रस्त्यासह राज्य मार्ग 19 कोठरे दिगर सटाणा ते पहुर या रस्त्याचे देखिल नुतनीकरणासह नदीनाल्यावरील पुलांच्या ठिकाणी पुल कम बंधारे या प्रस्तावित आहेत. या रस्त्यांच्या दुतर्फाचे चित्र आज पाहिल्यास विकासाकडे वाटचाल असली तरी भविष्यात निसर्गाचा समतोल ढळण्यास एक प्रकारे काढण्यात आलेली वनराईमुळे हातभारच लागत असल्याचे दिसत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!