बंद लिफ्टने आयुक्तांचे स्वागत

0
जळगाव । नवनियुक्त आयुक्त उदय टेकाळे हे पदभार घेण्यासाठी महापालिकेत आल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांना लिफ्टमध्ये अडकावे लागले. दोन ते तीन मिनिटे लिफ्ट तळमजल्यावर अडकलेली होती. अखेर चौथ्या मजल्यावर लिफ्ट बदलवून त्यांनी 13 व्या मजल्यावर जाऊन आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली.

महापालिकेची लिफ्ट बंद पडण्याचे प्रकार अनेकदा घडले आहे. अनेकांना मोठी कसरत करून या बंद लिफ्टमधून बाहेर काढण्यात आले आहेत. त्यातच शुक्रवारी नवनियुक्त आयुक्त उदय टेकाळे यांनाही याचा फटका बसला. लिफ्ट अडकल्याचे लक्षात येताच कर्मचार्‍यांची धावपळ उडाली. पुढील तासभर हाच विषय पालिकेत चर्चीला जात होता. एक नंबरची लिफ्ट नेहमी बंद पडत असते, असे असतानाही नवीन आयुक्तांना या लिफ्टमध्ये कसे पाठविण्यात आले, असा सवाल अनेकांनी यावेळी उपस्थित केला. दोन नंबरची लिफ्ट त्यावेळी नुकतीच निघून गेलेली होती. त्यामुळे नवीन आयुक्त आल्याने थोडी तारांबळ उडून त्यांना एक नंबरच्या लिफ्टमध्येच पाठविण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत उपायुक्त काहार व खोसे हे देखील होते.

12.21 वाजता आयुक्त टेकाळे महापालिकेत दाखल
12.23 वा. पर्यंत लिफ्ट अडकलेली.
12.25 वा. चौथ्या मजल्यावर लिफ्ट बदलली

LEAVE A REPLY

*