रिक्षा-ट्रॉलाची धडक : एक ठार; एक जखमी

0
चोपडा । शहराच्या गावाबाहेरील धरणगाव चौफुलीवर आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास गुर्जर एंटरप्राइजेसच्या दुकानासमोर मालवाहू रिक्षा निमगव्हाणकडे जात असतांना भरधाव वेगाने येणार्‍या ट्रॉलाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी व दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.

जगदीश कोळी (रा.बोरअजंटी) हा छोटा हत्ती क्रमांक (एमएच19बीएम 4786) घेऊन धरणगाव रस्त्यावरील हॉटेल इंडियावर बर्फ घेण्यासाठी जात होता. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक (सीजी04जेडी3895) या ट्रॉलाने छोटा हत्ती या मालवाहू रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रस्ताच्या कडेला फेकला गेला. रिक्षातील मजूर भुपेंद्रसिंग बाथम (वय 18, रा.मैनपुरी (उत्तरप्रदेश) ह.मु.तारामती नगर चोपडा) हा तरुण जागीच ठार झाला असून त्याच्यासोबत गाडीत बसलेला पंकज कश्यप हा तरुण गंभीर जखमी झाला. गाडीतील अन्य दोघे किरकोळ जखमी झालेत. ट्रॉलाचालकाने शिरपूरकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी पाठलाग करून शिरपूर बायपास रोडवर त्यास ताब्यात घेतले.

याप्रकरणी मालवाहू रिक्षाचालक जगदीश कोळी याच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस स्टेशनला भाग-5 गु.र.नं.40/2019 भा.दं.वि.कलम 304, 279 प्रमाणे ट्रॉलाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रदीप राजपूत करीत आहेत.

LEAVE A REPLY

*