सोशल मीडियातून जवानांचा देशसेवेसोबतच समाजसेवेसाठी पुढाकार

0
चाळीसगाव । सोशल मिडिया गैरवापर होताना, सद्या जोरात होताना दिसून येत आहे. परंतू सोशल मिडियाचा प्रभावी वापर करुन, समाजसेवा करण्याची खूनगाठ खान्देशातील सैन्यात कर्तव्य बजावणार्‍या जवानांनी बांधली आहे.

आपल्य हातावर प्राण घेवून आर्मी व इतर फोर्स मध्ये आहोरात्र देशसेवा करणार्‍या खान्देशातील जवांनानी सोशल मिडिया उपयोग करत, व्हॉट्स गृपच्या माध्यामातून एकत्र येवून, देशसेेवेबरोबर समाजसेवेचा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याची सुुरुवात चाळीसगाव येथून येत्या 15 ऑगस्ट पासून करण्यात येणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत सुट्टीवर आलेल्या ह्या जवानांनी दिली.

शहातील शासकिय विश्रामगृह येथे रविवारी संकाळी देशसेवेबरोबर समाज सेवेसाठी सरसावलेल्या जवानांनी पत्रपरिषदेेचे आयोजन केले होते. यावेळी जवान सचिन पाटील तांबाळे, समाधान सुर्यवंशी वडाळा, राहुल रावते खेड,बु, राजेंद्र प्रकाश पाटील डोणपिंप्री, मनोहर महाले दसकेबर्डी, राहुल पाटील हातले, प्रविण महाजन पोहरे, योगेश पाटील, विनोद देसले, पंढरीनाथ बोराडे, समाधान पाटील, सजंय पाटील, भास्कर पाटील आदि जवान उपस्थित होते.

राजेंद्र पाटील यांनी माहिती देतांना सांगीतले की, आम्ही देशसेवा तर करतच आहोत, परंतू आम्ही ज्या समाजात वावरतोे, त्या समाजासाठी काही तरी करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवित आहोत. हि संकल्पना आम्हाला सोशल मिडीयाच्या माध्यमातून सूचली आहे. त्यासाठी आम्ही जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या ठिकाणाचे खान्देशातील जे तरुण सैन्यात देशसेवा बजावत आहे, अशाचा गृप तयार करण्यास सुरुवात केले.

खान्देशी रक्षक या नावाने तब्बल आठ व्हॉट्स गृप आम्ही तयार केले. त्यात देशातील विविध भागात सेवा देत असलेले तब्बल 200 जवान तसेच काही पोलीस देखील आहेत. गृपवरील चर्चाच्या माध्यामातून आम्ही देशसेवेबरोबरच समाजसेवा करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचे ठरवले, आणि त्याच अनुंषगाने आम्ही येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र दिनाच्या शुभ मुहर्तावर पहिला उपक्रम शहरातील बी.पी.आर्ट, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स, कॉलेज धुळे रोड या ठिकणा घेत आहोत. या कार्यक्रमासाठी खान्देशातील सर्व सुट्टीवर आलेल्या फौजी जवानांनी या कार्यक्रमासाठी कॅमोफ्लाईज वर्दीतच यावे. व इतर जवानांनी आपल्याला अधिकृत असलेल्या वदीतच उपस्थित रहावे. तसेच कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येेने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

समाजसेवेसाठी विविध उपक्रम-
समाजात व्यस्थ जीवन जगत असतांना देखील देश सेवेसोबत समाज सेवा करणे, तरुण पिडीस देश सेवेकरीता उत्साहित करणे, फौजी व पोलीसांच्या स्व;ताच्या व कुटुंबियांच्या जिवानातील समस्यांबद्दल सर्व समान्यांना जाणिव करुन देणे, हा खान्देशी रक्षक गृपचा उद्देश आहे. त्यासाठी त्यांनी स्वातंत्र दिनी 15 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे होणार्‍या जवानाच्या परेड सारखीच परेेड मार्चिंगचे आयोजन केले आहे. त्यानतंर मोठ्या दिमाखात शहरात पहिल्याच एवढ्या मोठ्या संख्येने जवानाच्या उपस्थित ध्वजारोहन होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कमांडेण्ट एस.एस.बी.डि.एन.भोंबे, डिप्टी कमांडेण्ट एस.एस.बी वैभव परिहार उपस्थित राहणार आहेत. ध्वजारोहनतंर खान्देशीगृपच्यातर्फे रायफल सोबत अ‍ॅडवान्स डेमो, शहिद जवांनांच्या माता-पित्या व पत्नी यांचा सन्मान, आत्महत्या ग्रस्त शेतकर्‍यांच्या परिवाराला आर्थिक सहाय्य, भुकंप, पुर व आग संकट कालिन परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापानाचे धडे, रक्तदान शिबीर आदि कार्यक्रम होणार आहेत. दरवर्षी हे कार्यक्रम खान्देशातील विविध तालुक्यात घेण्यात येणार आहे.

खान्देशाबरोबर संपूर्ण देशात अशाचा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा मानस ह्या जवनांचा आहे. यासाठी त्यांनी कोणाकडेही आर्थिक मदत न मागता, स्वता;च्या खिशातून जी शक्य होईल ती मदत जमा करुन, ते कायक्रम करत आहे.

खान्देशी गृपचा समाजसेवेचा यज्ञ
जे खान्देश गृपचे जवान सुट्टीवर येतील ते नियमितपणे अशा प्रकारचे उपक्रम राबणार आहे. त्यांना ड्युटीवर जाणारे जवान पुढील कार्यक्रमांची रुपरेषा व जबाबदारी सोपवून जाणार आहेत. तसेच व्हॉट्स गृपच्या माध्यामतूनही कार्यक्रमांबाबत सूचना व इतर माहित देण्यात येणार असल्याची माहिती जवान समाधान सुर्यवंशी यांनी दिली. त्यामुळे खान्देशी गृपचा समाजसेवेचा यज्ञ आहोरात्र चालणार आहे.

LEAVE A REPLY

*