Type to search

maharashtra जळगाव

गोलाणी मार्केट परिसरातून मोटारसायकल लांबविली

Share
जळगाव । शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील पार्किंगमधून अज्ञाताने मोटारसायकल चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

कांचन नगरातील रहिवाशी असलेले समाधान माधव कोळी हे दि.5 रोजी गोलाणी मार्केट परिसरात काही कामानिमित्त आले होते. त्यांनी त्यांची मोटारासायकल क्रमांक एमएच 19 बीएच 8917 ही विजय टाईम या दुकानाजवळ लावली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी समाधान कोळी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ. सुनिल पाटील करीत आहे. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!