Type to search

Breaking News जळगाव मुख्य बातम्या

भुसावळात एकावर प्राणघातक हल्ला

Share

भुसावळ । येथील जळगाव रोडवरील नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या काच बंगल्यातील विहिरीवर सहा जणांनी एकावर पूर्व वैमनस्यातून प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना दि.25 रोजी दुपारी 3.45 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या जळगावरोडवरील काच बंगल्यातील विहिरीवरुन सद्या शहरात टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यांचे नियोजन येथील समाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे यांच्याकडे कामाला असलेले विकास देविदास कोळी (वय 40, रा. भुसावळ) यांच्याकडे आहे. दि.25 रोजी दुपारी 3.45 वाजेच्या सुमारास कोळी व टँकरचालक काच बंगल्यात बसलेले असतांना 6 जण तोंड बांधून दुचाकींवर काच बंगल्यात दाखल झाले. त्यातील एकाने विकास कोळी यांना काच बंगल्यातून बाहेर बोलवून व विहिरीकडे घेऊन गेले. त्याठिकाणी आलेल्या अज्ञात सहा जणांनी (तोंड रुमालाने बांधलेले) त्यांच्यावर दोन तलवारींनी वार केले. यात त्यांच्या डोक्याला चार, दोन्ही पाय व उजव्या हातावर तलवारीने वार करण्यात आले.

यावेळी परिसरात टँकर भरण्यासाठी आलेले टँकरचालकही उपस्थित होते. हल्ला सुरु होताच हल्लेखोरांनी टँकर चालकांना निघुन जाण्याचा दम दिला.त्यानुसार त्यांनीही तेथून पळ काढला. हल्लेखोरांनी कोळी यांना गंभीर जखमी करुन दुचाकींवरुन पसार झाले. यानंतर टँकर चालकांनी कोळी यांना येथील पालिका रुग्णालायात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. हाताला गंभीर दुखापत झाली असल्याने तात्काळ शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्यामुळे जखमी कोळी यांना तात्काळ उपचारासाठी गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत शहर पोलिसात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

सीसीटीव्हीची झाली असती मदत- शहरात दुष्काळ असतांना नगराध्यक्ष रमण भोळे यांनी मोठ्या मनाने आपल्या विहिरितून नगरसेवक व नागरिकांना पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या ठिकाणी एकावर प्राणघातक हल्ला झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार काच बंगला भागात सीसीटीव्ही नसल्याचेही समजते. या ठिकाणी सीसीटीव्ही असते तर आरोपींची ओळख होण्यास मदत झाली असती.

माफी मागून घेईल-काही दिवसांपूर्वीच हल्लेखोर व कोळी यांच्यात वाद झाला होता. हल्लेखोरांपैकी एकाने कोळी यांना बंगल्यातून विहीरीकडे नेत असतांना ‘आपण माफी मागून घेऊ’असे सांगत असतांनाही हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.
हल्ल्यांच्या घटनेत वाढ- आठवडाभरात हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. दि.21 रोजी येथील भर बाजारात तेली मंगल कार्यालयाजवळ प्रविण चौधरी व भाऊ यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसातच कोळी यांच्यावर हल्ला झाल्याने. शहरात पुन्हा गुन्हेगारी डोकेवर काढत आहे. यापूर्वीही अनेकांवर चाकू, तलवार व गोळीबारीच्या घटना घडल्य आहे. तरी पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात करण्याची आवश्यकता आहे.

भुसावळात पूर्ववैमनस्यातून चाकुहल्ला,सात जणांविरुद्ध गुन्हा
पूर्ववैमनस्यातून दुचाकीवरून आलेल्या कांतीलाल दंडगव्हाळ, भावेश दंडगव्हाळ ,मुकेश भालेराव ,जितू भालेराव ,अमोल चौधरी व अन्य दोघांनी विकास सपकाळे यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तलवारीने डोक्यावर व हातावर सपासप वार केले.याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात सातही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी प्रभारी पोलीस उपअधीक्षक निलोभ रोहन,शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी.बी.ठोंबे यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांनी धाव घेत जखमींना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात रवाना केले. तपास पोलीस उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी हे करीत आहे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!