जिल्ह्यात 30 हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट

0
जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-जिल्हयात जुन महिन्याच्या पहिल्या आठवडयात पावसाने दमदार हजेरी लावल्याने काही शेतकर्‍यांनी पेरणीला सुरवात केली होती.
परंतु गेल्या तीन आठवडयपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. येत्या 5 ते 6 दिवसात जोरदार पाऊस न झाल्यास 30 ते 35 हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने वर्तविली आहे.
जिल्ह्यातअनेक ठिकाणी पावसाअभावी व्यवस्थितपणे न अंकुरलेल्या पेरण्या मोडल्या जात आहेत.10 ते 20 हजार हेक्टरांवरील कोरडवाहू कापसाचे पीक बाधीत झाले आहे.

दरम्यान, जूनच्या मध्यावधीत अनेक शेतकर्‍यांनी कोरडवाहूमध्ये कापसाची लागवड केली. पावसाअभावी कापूस न अंकुरल्याने मोठा आर्थिक फटका शेतकर्‍याला बसला आहे.

त्यामुळे कोरडवाहू शेतकर्‍यांना दुबार पेरणीचा भार सोसावा लागणार आहे.कापसासह सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग या पिकांच्या पेरणी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात काही भागात करण्यात आली.

तर जिल्ह्यात चोपडा, जळगाव, पारोळा, यावल, रावेरचा काही भाग, मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव व एरंडोलमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे.

तसेच पाचोरा, चाळीसगावचा काही भाग, जामनेर या तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण सुस्थितीत आहे. पाचोरा, चाळीसगावसह इतर भागात तुरळक सरीमुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

सोयाबिन या पिकाला जास्त पावसाची आवश्यकता असते. परंतु, कमी पर्जन्यमानामुळे सोयाबीन अंकुरलाच नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

 

LEAVE A REPLY

*