जिल्ह्यात केवळ 40 टक्के ग्रामपंचायती हगणदारीमुक्त

0
जळगाव । दि.15 । प्रतिनिधी – शासनाने 100 टक्के हगणदारीमुक्त गावे करण्यासाठी अनेक योजना राबविल्या. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचे उदिष्टय देण्यात असून जुन महिन्या अखेर जिल्ह्यातील केवळ 40 टक्के ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहे.
अधिकार्‍याच्या दुर्लक्षतेमळे बर्‍याचशा ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झालल्या नसल्याचे दिसून येत आहे.
शासनाची आर्थिक मदत मिळविण्यासाठी घरकुलधारकांना शौचालय बांधणे शासनाने बंधनकारक केल्याने सर्व घरकुलधारक शौचालय बांधून शासकीय अनुदान घेत आहे.
तरी देखील जिल्हयातील 1151 ग्रामपंचायतींपैकी 425 ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या असून 726 ग्रामपंचायती अद्याप हगणदारीमुक्त झालेल्या नाहीत.

जिल्हात जवळपास 60 टक्के ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झालेल्या नसून यात सर्वाधिक अमळनेर तालुक्यातील असल्याचे समजते.

तालुक्यात बिकट स्थिती
जळगाव तालुकयातील 70 ग्रामपंचायतीपैकी जवळपास 31 ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या असून 39 ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झालेल्या नसल्याने जिल्हा परिषदेचा स्वच्छता विभाग नापास झाल्याचे बोलले जात आहे.

भुसावळ तालुक्याचे 100 टक्के उदिष्ट्य पूर्ण
भुसावळ तालुक्यातील 39 पैकी 39 ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या असून तालुक्याचे 100 टक्के उदिष्ट्य पूर्ण झाले असल्याचे जिल्हा परिषदेच्या स्वच्छता आणि पा.पु. विभागातर्फे सांगण्यात आले.

 

 

LEAVE A REPLY

*