जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचे सीईओंकडून स्वागत

0
जळगाव । दि.15 । प्रतिनिधी – गेल्या दोन महिन्यांपासून शहरासह जिल्हातील शाळांना लागलेल्या उन्हाळी सुटया संपल्याने आजपासून मराठी शाळांना सुरवात झाली.
शाळा प्रवेशोत्सवाद्वारे पहिल्या दिवशी शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे आदेश शासनकडून देण्यात आले होते.
त्या अनुषंगाने ढोलताशाच्या गजरात प्रभातफेरी काढून तसेच विद्यार्थ्यांचे औक्षण करून विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी सीईओ कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख यांनी धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देवून तेथील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पाठ्यपुस्तके देवून स्वागत केले.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते.

गणवेशाचे अनुदान खात्यावर न मिळाल्याने पालकांची नाराजी
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या 1849 शाळांच्या 1 लाख 59 हजार विद्यार्थ्यांना गणवेशाचे अनुदान मिळणार असून यंदा गणवेशासाठी 6 कोटी38 लाखाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. अनुदानाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. परंतू अद्याप हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले नसल्याने गणवेशाबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली.

 

 

LEAVE A REPLY

*