Friday, April 26, 2024
Homeजळगावग्रामपंचायतअंतर्गत 14व्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार

ग्रामपंचायतअंतर्गत 14व्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार

जळगाव  – 

चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव-पिंपरखेड तांडा (गोरखपूर) या गटात सन 2017-2018 आणि 2018-2019 या दोन वर्षात ग्रामपंचायतच्या 14 वित्त आयोगाअंतर्गत विविध कामे न करता, बील काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

- Advertisement -

अशी तक्रार जिल्हा परिषद सदस्या सुनंदा सिताराम चव्हाण यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

मात्र याप्रकरणाची ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे यांनी दखल न घेतल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद उमटले.

रांजणगाव-पिंपरखेड तांडा या गटात गेल्या दोन वर्षात 14व्या वित्त आयोगाअंतर्गत कामे  न करता, निधीची बीले परस्पर संगनमताने काढण्यात आली आहे.  या प्रकरणाची ग्रामपंचायत विभागामार्फत सीईओंनी चौकशी करुन संबंधीतांवर कारवाई करणे गरजेचे आहे. 

-सुनंदा चव्हाण,जि.प.सदस्या

घोळ प्रकरणात ग्रामपंचायत विभाग रडारवर 

ग्रामपंचायत विभागामधील 10 टक्के अनुशेष भरती प्रकरणात घोळ झाल्याची बाब उघडकीस आली आहे. त्या पाठोपाठच 14व्या वित्त आयोगाअंतर्गत पिंपरखेड तांडा (गोरखपूर) या गावात कामे न करता, परस्पर बीले सादर करुन ती अभियंत्यांमार्फत काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत विभाग पुन्हा चौकशीच्या रडारवर आला आहे.

सदस्यांच्या मागणीला केराची टोपली

गटात कामे न करता, परस्पर निधी लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी  जिल्हा परिषद सदस्या सुनंदा चव्हाण यांनी दि. 22 नोव्हेंबर रोजी प्रभारी सीईओंना निवेदनाव्दारे केली. मात्र या निवेदनाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे जि.प.च्या सभेत भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या