Type to search

जळगाव फिचर्स

जि.प. लघुसिंचन कार्यकारी अभियंता यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव

Share

जळगाव  –

सिंचन विभागाच्या कामांसदर्भात नेहमी वादग्रस्त असलेले जि.प. लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर.के.नाईक यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी उपस्थित केला. त्यावर सर्व सदस्यांनी टेबल वाजून बहुमताने ठराव पारित केला. सदस्यांची आक्रमक भूमिका पाहता सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांनी घोषणा केली. मात्र, नाईक हे राजपत्रित अधिकारी असल्याने त्यांच्या कार्यमुक्तीबाबत अंमलबजावणी करता येईल का? याबाबत संधिग्धता आहे.

राजपत्रित अधिकार्‍यांना कार्यमुक्त करण्याचा अधिकार सचिव स्तरावरील आहे,असे सीईओ डॉ. पाटील यांनी सांगितले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जि. प .अध्यक्ष रजनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शाहू महाराज सभागृहात मंगळवारी पार पडली. या सभेत उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती उज्ज्वला माळके, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अतिरिक्त सीईओ विनोद गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

सुरुवातीला जि.प. सदस्य पोपटतात्या भोळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना अनुदान देण्यासंदर्भात ठराव केला. सदस्यांना वेळेवर अजिंठा मिळत नसल्याची तक्रार जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन यांनी केली. यावेळी सदस्य मधुकर काटे, रावसाहेब पाटील, नंदकिशोर महाजन, प्रभाकर सोनवणे, शशिकांत साळुंके, गोपाल चौधरी, प्रतापराव पाटील, प्रा.डॉ.निलम पाटील,पल्ल्वी सावकारे, जयश्री पाटील, रावेरचे सभापती जितेंद्र पाटील, मुकुंद नन्नवरे यांनी प्रश्न उपस्थित केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!