Type to search

जळगाव

जि.प.च्या शाळांत आजपासून किलबिलाट

Share

जळगाव । शहरासह जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा 17 जून रोजी उघडणार आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके पहिल्याच दिवशी मोफत देण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे आहे. त्यादृष्टीने मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच शालेय समिती अध्यक्ष, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच आदींच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

उन्हाळी सुटीनंतर गेल्या दीड-दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांविना ओस पडलेल्या शाळा सोमवारी पुन्हा गजबजणार आहेत. त्यादृष्टीने जि.प. शाळांमधील शिक्षकांनी आपाल्या शाळामध्ये तय्यारी सुरु होती. जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील 4 लाख 68 हजार 584 विद्यार्थ्यांना 26 लाख 55 हजार 630 पुस्तके मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच शहरातील महापालिका शाळा आणि खासगी शाळांची घंटा सोमवारी वाजणार असल्याने पहिल्याच दिवशी लहान चिमुकल्यासह विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता लागून आहे. प्रत्येक शाळास्तरावर विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी पूर्णत्वाकडे आहे असून त्या क्षणाची उत्कंठा विद्यार्थ्यांना लागून आहे.

विद्यार्थ्यांची वाजत-गाजत मिरवणूक निघणार
जिल्ह्यातील जि.प. शाळांमधील मुख्यध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहे. त्यानुसार शाळा परिसरात रांगोळी, शाळांविषयी अद्ययावत सुविधा, नवीन आलेल्या विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूक काढून त्यांचे स्वागत करावे, शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याच्या सूचना शिक्षण विभागातर्फे शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी दिल्या आहेत. शाळा परिसरात चिमुक व पहिले ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा पहिल्याच दिवशी किलबिलाट सुरु होणार आहे. शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!