जिल्ह्यातील बीडीओंच्या बदल्या

0
जळगाव । दि.21 । प्रतिनिधी-जिल्ह्यातील गटविकास अधिकारी यांच्या बदल्या झाल्याचे शासन आदेश जारी करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील 5 गटविकास अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे.आर. देवरे यांची नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे बदली करण्यात आली.
तर भडगाव येथील गटविकास अधिकारी एस.डी. जाधव यांची धरणगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली.
तर औरंगाबाद जिल्ह्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.बी. जोशी यांची जामनेर येथे पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली.
तर हिंगोली जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली अशोक कोतवाल यांची भडगाव गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली.

जि.प. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.पी. कुटे यांची अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात सहाय्यक आयुक्त (चौकशी) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित अधिकार्‍यांनी त्यांच्या नवीन पदाचा पदभार त्वरित स्विकारण्याचा आदेशही शासन परिपत्रकात म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

*