शिक्षण विभाग पोषण आहार ठेकेदारावर मेहरबान

0
जळगाव । दि.31 । प्रतिनिधी-शिक्षण विभागाने पोषण आहाराच्या ठेकेदाराला अवघ्या 14 दिवसात 4 वर्षांची 3 हजार 500 पानांची माहिती देवून मेहरबानी केली असल्याची आज समोर आली आहे.
मात्र तक्रारदाराने वेळोवेळी मागितलेली पोषण आहाराच्या भष्ट्राचाराची माहिती शिक्षण विभागाने देण्यास टाळाटाळ केली असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
पोषण आहारातील निकृष्ट दर्जा पुरवठा, भष्ट्राचार तक्रारदार रविंद शिंदे, सदस्य पल्लवी सावकारे, जयपाल बोदडे, माधुरी अत्त्तरदे यांनी उघडकीस आणला.

सन 2014 मध्ये देखील जळगावातील एका शाळेत निकृष्ट दर्जाचा पोषण आहाराचा पुरवठा झाला होता. यावेळी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.

तरी देखील गुन्हा दाखल झाला नव्हता. तक्रारदार शिंदे यांनी सन 2014 पासून पोषण आहाराची वेळोवेळी शिक्षण विभागाकडे माहिती मागून भष्ट्राचार उघड केला.

शिक्षणमंत्र्यांनी ठेकेदाराला मुदतवाढ देवून नये असे आदेश दिले असतांना देखील शिक्षणसंचालकांनी एका महिन्याची मुदतवाढ दिल होती.

ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचा पुरवठा केल्याने सर्वसाधारण सभेत ठेका रद्द करुन भष्ट्राचाराची सीआयडी चौकशी करण्याचा ठराव करण्यात आला होता.

पोषण आहराचा विषय थेट मंत्रालयपर्यंत गाजल्याने आता पोषण आहार खरेदीचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीला देण्यात आले आहे.

दरम्यान पोषण आहार ठेकेदार साई मार्केटींगचे सुनिल झंवर यांनी सन 2014 ते 2017 या चार वर्षांची माहिती शिक्षण विभागाकडून दि.15 जुलै रोजी मागितली.

शिक्षण विभागाने तत्परता दाखवून अवघ्या 14 दिवसांत 3 हजार 500 पानाची माहिती देवून मेहरबानी केली आहे.

पल्लवी सावकारे यांनी मागितली माहिती
पोषण आहार ठेकेदार झवर यांना शिक्षण विभागाने पुरविलेली माहिती जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी शिक्षण विभागाकडून जशीच्या पुरविण्यात यावी अशी मागणी केली आहे.

 

 

LEAVE A REPLY

*