जि.प. नियमबाह्य खातेवाटपाची आज सुनावणी

0
जळगाव । दि.26 । प्रतिनिधी-जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या नियमबाह्य खातेवाटपाची उद्या दि.27 रोजी नाशिक येथे विभागीय आयुक्त यांच्याकडे सुनावणी होणार असून याकडे जिल्हयाचे लक्ष लागून आहे.
दरम्यान उद्या अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे.
जि.प विषय समित्यांच्या नियमबाह्य खातेवाटपाची भाजपच्या पल्लवी सावकारे यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती.

या तक्रारीची दखल घेवून विभागीय आयुक्तांनी अध्यक्षांसह संबंधितांना सुनावणीसाठी बोलविले होते. अध्यक्ष उज्वला पाटील यांनी महिला व बालकल्याण समिती सभापती यांच्याकडे बांधकाम समितीचे पद देवून जिल्हा परिषद अधिनियमातील तरतुदींचा भंग करून नियमबाह्य खातेवाटप केली आहे.

त्यानुषंगाने भाजपच्या सदस्य पल्लवी सावकारे यांनी याबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेण्यात आल्याने मागील आठवड्यात दि.19 रोजी सुनावणीसाठी अध्यक्षा यांना बोलविण्यात आले होते.

यावेळी त्यांच्यावतीने वकीलाने बाजू मांडून आठ दिवसांची मुदत मागितली होती. त्याअनुषंगाने दि.27 रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली असून उद्या अंतिम सुनावणी होणार आहे. याकडे जिल्हयाचे लक्ष लागून आहे.

 

LEAVE A REPLY

*