खातेवाटपप्रकरणी 27 रोजी अंतिम सुनावणी

0
जळगाव । दि.19 । प्रतिनिधी-जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या नियमबाह्य खातेवाटपाची भाजपच्या सदस्याने विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती.
या प्रकरणी आज सुनावणीला सुरवात झाली. दरम्यान अध्यक्षांच्या वकीलांनी मुदत मिळावी असे सांगितल्याने आठ दिवसांची मुदत देण्यात आली. त्यामुळे दि.27 रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी महिला व बालकल्याण समिती सभापती यांच्याकडे बांधकाम समितीचे सभापती पद देवून जिल्हा परिषद अधिनियमातून तरदतुदीचा भंग करून नियमबाह्य खातेवाटप केली.
जि.प विषय समित्यांच्या नियमबाह्य खातेवाटपाबाबत भाजपाच्या पल्लवी सावकारे यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती.

याप्रकरणी सुनावणी आज सुरवात होवून अध्यक्ष उज्वला पाटील यांच्यावतीने अ‍ॅड. साठे यांनी वकीलपत्र सादर करून मुदतवाढ मागितली.

यावेळी तक्रारदार पल्लवी सावकारे यांच्यावतीने अ‍ॅड. हरीश पाटील यांनी मुदतवाढीवर तीव्र हरकत घेतली. सभापती रजनी चव्हाण यांच्या वतीने अ‍ॅड. कुळकर्णी यांनी डेप्युटी सीईओ नंदकुमार वाणी आयुक्तांकडे दिलेल्या इतिवृत्ताची प्रत मिळावी अशी मागणी केली.

यावेळी रजनी चव्हाण यांचे वकील व अध्यक्ष यांच्या वकीलांना इतिवृत्ताची प्रत देण्यात आली.

दरम्यान विभागीय आयुक्तांनी पुढील तारखेला अंतिम सुनावणी होईल असे सांगितले. त्यामुळे पुढील सुनावणी दि.27 जून रोजी होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*