Type to search

maharashtra जळगाव

दुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषदेची सभा गाजणार

Share
जळगाव । जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवार दि.21 रोजी जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शाहू महाराज सभागृहात होणार आहे. जिल्ह्यात सर्वदूर असलेल्या भीषण दुष्काळाचा पार्श्वभूमीवर या सभेत रणकंदन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी शासकीय पातळीवर कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा योजनांची सध्यास्थिती याविषयावरुन मंगळवारी सदस्य दुष्काळाची परिस्थिती जाणून त्या आधारे सभेत प्रशासनाला जाब विचारणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अंतिम टप्प्यात पोहचल्यानंतर दुष्काळासाठीही आचारसंहिता शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे उपाययोजना सुरु झाल्या आहेत की नाही. प्रशासकीय पातळीवर उपाययोजनांचा दुष्काळ आहे. त्यामुळे जिल्ह्यात टँकरचा तुटवडा जाणवत आहे. पाण्याअभावी जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. प्रशासनाने आचारसंहितेचा बाऊ केल्यामुळे वेळीच उपाययोजना होवू न शकल्याची खंत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. पाणीपुरवठा संदर्भात तात्पुरत्या स्वरुपात किती पाणीपुरवठा योजनांना मान्यता देण्यात आली आहे. याविषयी प्रशासन अनभिज्ञ आहेत. त्याचप्रमाणे गुरांसाठी चारा आणि पाण्याचा प्रश्न ग्रामीण भागात गंभीर बनला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या बैठकांविषयी सभेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणार आहे. प्रशासकीय पातळीवर इतकी अनास्था असल्यामुळे उपाययोजना होत नसल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यात आहे. मात्र लोकप्रतिनिधी दुष्काळाविषयी फारसे गांभीर्याने आवाज उठवत नसल्यामुळे शेतकर्‍यांचे व ग्रामीण जनतेचे हाल होत आहे. सर्वसाधारण सभेवर दुष्काळ बैठकां घेण्यात आल्या का?, बैठक झालेली नसल्यास त्याची कारणे काय? ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने काय उपाययोजन केल्या. पाणीपुरवठा योजनांची सध्यस्थिती व तात्पुरर्त्या स्वरुपात किती योजनांना मंजूरी दिली. जिल्ह्यात शालेय पोषण आहार सुरु आहे की बंद असे महत्वाचे विषयी सभेत उपस्थित होण्याची शक्यता आहे.

पोषण आहाराचा उडाला बोजवारा
दुष्काळी तालुक्यामध्ये शालेय पोषण आहार देण्याचे आदेश सरकारने दिले आहे. उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे काही विद्यार्थी बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थी येत नाहीत. तर शिक्षण विभागाने पाच-सहा विद्यार्थ्यांनी उपस्थिती असल्याचा दावा केला आहे. दुष्काळामुळे पाणीच उपलब्ध होत नसल्याचे कारण देत शिक्षकांनी पोषण आहारापासून पळ काढला आहे. या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. त्यावर जिल्हा परिषद सदस्य आवाज उठविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!