Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

युवारंगमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण

Share
जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाच्या स्पर्धा शुक्रवारी सकाळी 9 वाजता सहा रंगमंचांवर सुरु झाल्या. मिमिक्री, मुकनाटय, विडंबन आणि समुह लोकनृत्य, काव्य, वक्तृत्व, फाईन आर्ट याद्वारे विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक संवेदना अत्यंत तरलपणे सादर केल्या. प्रत्येक कलाप्रकार सादर करताना तरुणांमध्ये उत्साह आणि कलेशी असलेला प्रामाणिकपणा व तडफ दिसून येत होती. उपस्थित रसिकांकडून कलांना उत्स्फुर्त दाद मिळत होती.

सकाळी 9.30 वाजता दीक्षांत सभागृहाच्या रंगमंचावर मिमिक्री या कलाप्रकाराने स्पर्धा सुरु झाली. नरेंद्र मोदी, नाना पाटेकर, अमिताभ, निळू फुले, गुलशन ग्रोवर, दादा कोंडके यांच्या हुबेहुब आवाजाद्वारे विविध सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न कलावंतांनी केला. त्यानंतर या मंचावर अत्यंत ताकदीची मुकनाटये सादर झाली. मोबाईलमुळे हरवलेल्या मानवी संवेदना, तृतीय पंथीयांवर होणार अन्याय, पर्यावरणाचा ज्हास, मानवी उत्क्रांती, जाती व्यवस्था यावर मुकनाटयाद्वारे प्रखर भाष्य करण्यात आले.त्यानंतर विडंबन नाटयाद्वारे विद्याथ्र्यांनी उपहास हा कशा पध्दतीने मांडता येतो याचा वास्तुपाठ घालून दिला.

अधिसभागृहात असलेल्या रंगमंच क्र.2 वर दिवसभर लोकगीत, सुगम गायन (भारतीय) व सुगम गायन (पाश्मिात्य), समुहगीत यामुळे वातावरण संगीतमय झाले होते. भारतीय लोकगीतात गवळण, गोंधळ, भारुड सादर करुन तरुणपिढीने आपली लोकसंगीताशी असलेली नाळ दाखवून दिली.

सुगम गायन (पाश्चिमात्य) या कलाप्रकारात पाश्चिमात्य गायनातील नवे ट्रेंड सादर करुन परदेशी संगीताचा अभ्यास ही तरुणपिढी करत असल्याचा संदेश दिला. सुगम गायन (भारतीय) या कलाप्रकारात राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सदाचार संकल्पना दे, चंद कलियोंके मुस्कुरानेसे, चंद कलीया चुनकर, सजल नयन नीत धार, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, कोई मिलता है तो अपना पता पुछता है, तुम्हारे सेहेरेका मौसम बडा सुहाना लगे, रंजिरा ही सही, अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओळी, जब तक मिले न ये तो कोई पुछता नही, खुद को बेहतर है सरानों मे भटकता देखू आदी गझल व अभंग सादर करण्यात आले.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी भवनातील रंगमंच क्र.3 वर शास्त्रीय गायनात विहाग, विलासतोडी, बागेश्री, अहिरभौरव, यमन, मारुबिहार, पुरीयाधन, पुरीया धनश्री, वृंदावनी सारंग, मिया मल्हार, मुलतानी राग सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली. त्यानंतर या मंचावर शास्त्रीय वादन (सुरवाद्य) भूप, यमन कल्याण, अहिरभौरव, दरबारी, भुपाली, वृंदावन सागर, हंसध्वनी आदी राग सादर करण्यात आले. समुहगीत (पाश्चिमात्य), शास्त्रीय नृत्य आणि तालवाद्य हे कलाप्रकार सादर झाले.

सामाजिकशास्त्रे प्रशाळेच्या सभागृहातील रंगमंच क्र.4 वर शेतकरी, स्त्रीवाद, पर्यावरण, प्रेम, राष्ट्रभक्ती, यावर भाष्य करणाज्या ताकदीच्या कविता विद्यार्थ्यांंनी सादर केल्या. चित्रकलेसाठी डिजिटल इंडिया, जलसंवर्धन आणि रस्ता सुरक्षितता हे विषय होते.

शनिवारी बक्षीस वितरण
उद्या शनिवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता दीक्षांत सभागृहात पारितोषिक वितरण समारंभ होणार असून सुप्रसिध्द अभिनेता व दिग्दर्शक योगेश कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिके दिली जाणार आहेत. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील राहतील.

सी.गो.पाटील महाविद्यालयाची जनजागृती
या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समृध्द भारताचा संदेश मुकनाट्यातून दिला. यात पाणी वाचवा, हागणदारीमुक्ती, कुटूंब नियोजन, स्वच्छता अभियान, मुलींचे शिक्षण, वृक्षतोड यावर ज्वलंत भाष्य करणारे मुकनाट्य सादर केले. यात हर्षदा राणे, हर्षदा शिवदे, हर्षदा अहिरराव, शाहरुख खाटीक, प्रतिक्षा अग्निहोत्री यांनी पात्र निभावली त्यांना संगीतसाथ विशाल पुरकर यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!