मसाका सभासदांना शेअर्स व टनेजची साखर मिळणार का ?

0
अरुण पाटील,यावल । दि.19 ।-मधुकर सहकारी साखर कारखाना लि. फैजपूर ता.यावल हि गिरणी खान्देशात तग धरून असून शेतकरी वर्ग कारखान्याला ऊस पुरवठा करतो.
मात्र त्यांना टनेज व शेअर्सची साखर मिळत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करतांना दिसतात.
मधुकर साखर कारखाना गेल्या काही दिवसापासून तोट्यात होता व पुन्हा भर पडल्याने तो तोट्यात असल्याने मसाका संचालक मंडळाने ऊस उत्पाक शेतकरी सभासद व ऊस उत्पादक यांना शेअर्सवर आणि टनेज मागे पुर्वी साखर मिळत होती. ती मिळत नाही.

संचालक मंडळाने धोरणात्मक निर्णय घेवून ही साखर द्यावी अशी शेअर्स सभासद व उत्पादकांची भावना आहे. मात्र संचालक मंडळ ही याबाबत अनुकूल असल्याचे सांगण्यात येते परंतु ज्या अशा संंस्था तोट्यात असतात त्यांना साखर आयुक्त साखर वाटपाची परवानगी देत नाही. ही कायदेशीर अडचण असते.

याच मुद्यावर मधुकर साखर कारखान्यात राजकारणही तापते. मात्र शेतकरी सभासद मसाकाच्या पाठीशीच उभे राहतांना दिसतात.

एकीकडे यावल -रावेर हा बेल्ट केळी उत्पादनातही अग्रेसर आहे. मात्र गेल्या 5/6 वर्षापासून कधी कळीवर नैसर्गिक आपत्ती तर कधी व्यापार्‍यांच्या हुकूमशाही पध्दतीमुळे केळीला बोर्ड भावापेक्षा 100 ते 150 रूपये कमी भाव तसेच व्यापार्‍यांकडून पैसे मिळण्यास होणारी अडचण लक्षात घेता ऊस हा हमीभावामुळे शेतकरी वर्ग ऊस लागवडीकडे पसंगी नोंदवितांना दिसतात.

एखाद्या वेळी ऊसाला पाणी कमी पडले, वादळ आले तरी ऊस हे कोडगे पिक असल्याने त्याचे नुकसान होत नाही. मात्र केळीला जबर फटका बसतो.

त्यामुळे शेतकरी वर्ग ऊसाला प्राधान्य देतात. हमीभावाची रक्कम ऊसाची दोन वेळा परंतु न बुडणारी असते व कारखाना टिकावा हाच उदात्त हेतू ठेवून ऊस लागवड होते.

टनेज व शेअर्सची साखर सभासदांना मिळावी यासाठी संचालक मंडळ साखर आयुक्तांच्या संपर्कात असुन जिल्हा बँकेकडे साखरची पोते मॉर्गेज असतात. यासाठी साखर आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागुन आहे.

 

LEAVE A REPLY

*