पुरुषांपेक्षा स्त्रीयांमध्ये ‘कॅन्सर’च्या प्रमाणात वाढ

0
जळगाव । दि.29 ।-बदलत्या जीवनशैलीमुळे सद्या अनेक आजार बळावु लागले आहे. कॅन्सरसारख्या आजाराचा धोका उद्भवत असून पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे.
जिल्ह्यात दर 35 स्त्रियांमागे 1 असे प्रमाण आहे. त्यात सर्वाधिक स्तनाच्या कॅन्सरमध्ये वाढ झाली असल्याचे कॅन्सरतज्ञांचे मत आहे.

कॅन्सर या आजाराचे अनेक प्रकार आहेत. देशात स्त्री-पुरुषांमध्ये हे प्रमाण सारखेच असले तरी आता स्त्रीयांमध्ये कॅन्सरच्या प्रमाणात वाढ होत आहे.

त्यात दरवर्षी दीड लाख स्त्रियांना स्तनाचा कॅन्सर, एक लाख स्त्रियांना गर्भमुखाचा तर 25 हजार मुख व गळ्याचा कॅन्सर झालेल्या स्त्री रुग्ण आढळून येत आहे.

लग्न उशिरा होणे, फॅमिली प्लॅनिंगमुळे, गर्भधारणा उशीराने होणे, अपत्य झाल्यानंतर स्तनपान न करणे, वंध्यत्व येणे तसेच रजोनिवृत्तीनंतर लठ्ठपणाचे प्रमाण वाढणे या कारणांमुळे स्त्रियांना स्तनाचा कॅन्सर व विषाणुमुळे आणि एचपीव्ही (ह्युमन पॅपीलोमा व्हायरस)मुळे गर्भमुखाचा कॅन्सर आणि धुम्रपान आणि तंबाखुजन्य पदार्थ सेवन केल्यामुळे मुख व गळ्याच्या कॅन्सरची लक्षणे आढळून येतात.

… तर इतरांना आजाराचा प्रार्दुभाव
कॅन्सरचे प्राथमिक अवस्थेचे लक्षण आढळल्यास उपचार करावा किंवा रसायनोपचार (किमोथेरपी), किरर्णोपचार पध्दतीने उपचार करणे गरजेचे आहे. कॅन्सरच्या जखमेकडे दुर्लक्ष केल्यास ती जखम किंवा गाठ फुटून दुर्गंधी पसरते आणि कुटुंबातील इतरांनाही त्यापासून आजाराचा प्रार्दुभाव होण्याचा धोका असतो.

मुलींना ‘एचपीव्ही’ लसीकरण केल्यास प्रतिबंध
मुलींना वयाच्या दहाव्या वर्षानंतर एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) ही प्रतिबंधात्मक लस देणे आवश्यक आहे. ही लस दिल्यास स्तन, गर्भमुखाचा कॅन्सर प्रतिबंधीत होत असतो.

अशी आहेत लक्षणे
* स्तनाचा कॅन्सर
– वेदनारहीत व अविचलीत गाठ
– काखेत गाठ होणे
– स्तनाग्रहातून रक्त येणे
– एकाच बाजुच्या स्तनग्रहाला खाज सुटणे
* गर्भमुखाचा कॅन्सर
– अनियमित रक्तस्त्राव
– रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव
– पांढरं पाणी जाणे
* मुख आणि गळ्याचा कॅन्सर
– जीभ, हिरड्या व गालावर जखम होणे
– गळ्यामध्ये टोचल्यासारखे वाटणे
– आवाजात बदल (दोन आठवड्यापेक्षा दीर्घकाळ)

अशी घ्यावी काळजी
* लक्षणे आढळल्यास कॅन्सरतज्ञांचा सल्ला घेणे
* तपासणी करणे
* बाह्यांगाची स्वच्छता ठेवणे
* मुलींना दहाव्या वर्षानंतर एचपीव्हीची लस देणे
* तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन टाळणे

 

LEAVE A REPLY

*