Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

‘वेडिंग एक्स्पो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Share
प्रिती अ‍ॅण्ड जयचे ब्राइडल, ग्रुम पॅकेज
लग्न समारंभासाठी प्रिती अ‍ॅण्ड जय हेअर अ‍ॅण्ड ब्युटी अकॅडमीतर्फे ब्राइडल अ‍ॅण्ड ग्रुम पॅकेज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यात विशेष म्हणजे बाहेर गावच्या ऑडर्स स्विकारल्या जातील. तसेच टकले पणापासून मुक्तीसाठी कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया व औषधोपचार न करता हेअर व्हिव्हींग व हेअर एक्सटेंशनची प्रक्रिया केली जाते. तसेच बारबरींग, बेसीक कोर्स, अ‍ॅडव्हान्स कोर्स, स्कीन, ट्रिटमेंट, केमिकल सायन्स, मेकअप, स्कीन ट्रिटमेंट, बॉडी मसाज, बॉडी थेरपी आदींची सुविधा उपलब्ध आहे.

इंडस हेल्थ प्लसची पॉवरफुल पॅकेजेस
इंडस हेल्थ प्लसतर्फे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. 17 राज्यांमधील 6 लाखांपेक्षा जास्त कुटूंबांना इंडसने आरोग्याचे सुरक्षाकवच प्रदान केले आहे. यात अडॉलसन्ट 13 प्लस, इसेन्शिया 18 प्लस, सुपेरिया 25 प्लस, प्रायमा 30 प्लस, ऑप्टिमा 35 प्लस, इसेन्शिया प्री- मॅरिटल, डोमेस्टिक हेल्प, सुपेरिया प्री- मॅरिटल, डोमेस्टीक हेल्प, इसेन्शिया प्री- प्रेग्नन्सी आदी पॅकेजद्वारे आरोग्यविषयक सुविधा प्राप्त करुन दिल्या जात असल्याचे मार्केटींग प्रतिनिधी रत्नाकर पाटील यांनी सांगितले.

सुशिल क्रिएशनच्या वेस्टर्न ज्वेलरीची क्रेझ
लग्न समारंभ असो किंवा इतर कौटूंबिक कार्यक्रम महिलांसाठी दागिणे हे महत्वपूर्ण मानले जातात. यासाठी सुशिल क्रिएशनतर्फे महिलांसाठी विविध फॅन्सी दागिणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यात विशेष म्हणजे वेस्टर्न ज्वेलरीचे आकर्षक महिलांना अधिक पहावयास मिळाले. महिलांसाठी विविध प्रकारच्या घड्याळ, पर्स, मंगळसूत्र, बांगड्या, नथ, कर्णफुले आकर्षक स्वरुपात आहेत. जयपूर, मुंबई, इंदौर या मोठ्या शहरात मिळणारे फॅन्सी दागिणे माफक दरात विक्रीसाठी स्टॉलवर उपलब्ध असल्याची माहिती संचालिका संगिता दैय्या यांनी दिली.

नवरदेवासाठी लुईस क्रिएशनचे वस्त्रदालन
लग्न समारंभात नवरदेवासाठी लागणारे कोट, सूट, शेरवानी आदी विविध प्रकारात वस्त्र उपलब्ध आहेत. नवरदेवासाठी लागणारे वस्त्र अतिशय आकर्षक आणि नवनविन फॅशननुसार वस्त्र खरेदीस प्रतिसाद मिळत असल्याचे लुईस क्रिएशनचे सुमीत दहारा यांनी सांगितले. यासह कुर्ता पायजामा, मोदी जॅकेट, इंडो वेस्टर्न, ज्युती, मोतीहार देखील ग्राहकांना अतिशय माफक दरात विक्री केले जात आहे. यावेळेस ग्राहकांसाठी लुईसने खास ऑफर आणली असून यात 2 हजार रुपयांच्या खरेदीवर आकर्षक सरप्राईज गिफ्ट दिले जाणार आहे.

छाया आर्टस गॅलरीचे गिफ्ट साहित्य
साखरपुडा, हळदी, लग्न समारंभ असो किंवा डोहाळे आणि बारशाचा कार्यक्रम यात आवश्यक असणारे विविध साहित्य छाया आर्टस अ‍ॅन्ड गिफ्ट गॅलरीत आहेत. यामध्ये ग्राहकांच्या बजेटनुसार त्यांना संपुर्ण साहित्य तयार करुन दिले जात असल्याचे डॉ. काजल फिरके यांनी सांगितले. तसेच आर्टिफिशियल फुले, बुके, हेअर अ‍ॅसेसरीज, नवरीचा साज, पुजा थाळी, साखरपुडा सामान सजावटीचे साहित्य सर्वसामान्य ग्राहकांना परवडणार्‍या दरात उपलब्ध आहेत. तसेच आर्टिफिशियल साहित्य, फोम फ्लॉवर ज्वेलरी, चॉकलेट बनविण्याच्या क्लासेस देखील घेतल्या जातात.

बलून डेकोरेशनसाठी रेश्माई इव्हेंट
लग्नसमारभ, वाढदिवस, नामकरण समारंभ, पार्टी किंवा सामाजिक कार्यक्रमात स्टेज सजावटीसाठी प्रसिध्द असलेल्या रेश्माई इव्हेंटतर्फे फुग्यांपासून विविध प्रकारच्या सजावटी करणे म्हणजेच ‘बलून डेकोरेशन’ची क्रेझ ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे. तसेच मिकी माऊस, जोकर, छोटा भीम, मोटू -पतलू, डोरोमॉन आदी कार्टूनमधील सजीव भुमिका, पेशवाई गृप, नवरीसाठी सजविलेली डोली, इलेक्ट्रॉनिक्स फटाके अशा विविध आकर्षक सजावटी रेश्माई इव्हेंटतर्फे ग्राहकांसाठी किफायतशीर दरात करुन दिल्या जातात.

ब्राईडल योगा फुलविते अंर्तबाह्य सौंदर्य
आनंदी, निरोगी जीवन आणि अंर्तबाह्य सौंदर्यासह सर्वांगिण व्यक्तीमत्व विकासासाठी डॉ.भावना चौधरी यांच्या ब्राईड योगा क्लिनीकच्या माध्यमातून उपचार पध्दती आणि कोर्सेस राबविले जात आहे. यात योग, प्राणायाम शिबीर, शुध्दीक्रिया औषधी, पंचकर्म उपचार केले जात असून यात विशेष म्हणजे कुठल्याही औषधीशिवाय निखळ सौंदर्य प्राप्त होत असल्याचे डॉ. भावना चौधरी यांनी सांगितले. आवळा व्हेपर्स, सुगंधी उटणे, संधिवात तेल, जिवनप्राश, अभ्यंग तेल, डीएसके पावडर, आवळा सिरप आदी औषधी उत्पादनांची निर्मिर्ती केली जाते.

पारंपारिक वस्त्रांसाठी ‘संस्कृती’चे दालन
धार्मिक कार्य असो किंवा इतर समारंभ यात पारंपारिक वस्त्र परिधान करण्याला प्राधान्य दिले जाते. सध्या तर लग्नसमारंभातही पारंपारिक वस्त्रांची क्रेझ पुन्हा वाढतांना दिसत आहे. त्यामुळे संस्कृती वस्त्रदालनात सहावारी, नववारी साडी रेडीमेड तसेच शिऊन देण्याची व्यवस्था, धोतर व सोवळे, ड्रेस मटेरिअल, कलात्मक आणि पारंपारिक दागिणे, लहान मुलांसाठी धोती व कुर्ता आदी पारंपारिक वस्त्रे ग्राहकांचे आकर्षण ठरत आहेत. सणासुदीत या कपड्यांवर ग्राहकांना विशेष सुट देखील देण्यात येत असते.

बग्गी, बॅण्डसाठी प्रसिध्द चाँदभाई बग्गीवाले
लग्न सराईत सफेद आणि डौलदार घोड्याला अधिक मागणी असते. यात आता विविध प्रकारच्य बग्गीला सुध्दा पसंती दिली जात असून चाँदभाई बग्गीवले यांच्याकडील मार्बल बग्गी, काचाची बग्गी, पटीयाला बग्गी प्रसिध्द असून सफेद घोडा देखील आहे. यासह डिजीटल, म्युझिकल, ब्रास बॅण्ड, साधा बॅण्ड देखील उपलब्ध असून पारंपारिक बॅण्डची परंपरा आजही जोपासत असल्याचे मास्टर अलिमभाई यांनी सांगितले.

वैष्णवी ब्राईडल आणि फोटो ब्रदर्स
आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टीस्ट असलेल्या नेहा चौधरी यांच्या वैष्णवी ब्राइडल स्टुडीओमध्ये महिलांचे सौंदर्य फुलविण्यासाठी विशेष आर्टीस्टद्वारे मेकअपची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यात एचडी, थ्रीडी, एअर ब्रश अशा विविध प्रकारचे पॅकेज आहेत. तसेच लग्न समारंभाच्या ऑर्डर देखील घेतल्या जात असून फोटो ब्रदर्स स्टूडीओत ग्लोसी, मॅट, मेटॅलिक अशा विविध प्रकारात लग्नाचे फोटो अल्बम करुन दिले जातात.

आकर्षक रोषणाईसाठी विजय साऊंड
विशेष समारंभाप्रसंगी आकर्षक विद्युत रोषणाईसह उत्कृष्ठ साऊंड सिस्टीमची व्यवस्था करण्यासाठी विजय साऊंडला ग्राहकांकडून अधिक प्रतिसाद दिला जात आहे. यामध्ये लाईटिंग, डिस्को लाईट, हॅलोजन आदींसह डि.जे. अशा विविध प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा माफक दरात उत्कृष्ठ साऊंड सिस्टीमसह लाईटिंग सजावटीचे काम केले जाते.

श्री फोटोजची क्रेझ
फोटोग्राफीच्या क्षेत्रात 25 वर्षांची परंपरा असलेले श्री फोटो स्टुडिओतर्फे अत्याधुनिक कॅमेर्‍यांच्या माध्यमातून फोटो तसेच व्हिडीओग्राफी केली जात असून लग्नसमारंभ, प्री वेडींग, डॉक्युमेंटरी शुटींग, सिनेमॅटीक फोटोग्राफी, पोर्टफोलीओ, इंडस्ट्रीयल फोटोग्राफी, मॉडेलींग अशा विविध प्रकारांसह लाईव्ह सेटअप, ड्रोन कॅमेर्‍यांच्या माध्यमातून फोटो तसेच व्हिडीओग्राफीची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे विशेष कार्यक्रमांमध्ये श्री फोटोजला अधिक मागणी असल्याचे दिसून येते.

अविष्कार इव्हेंट मॅनेजमेंटस्
डोहाळे जेवण, नामकरण असो किंवा वाढदिवसाचा कार्यक्रम बलून डोकोरेशनसाठी स्पेशलिस्ट असलेल्या अविष्कार इव्हेंट मॅनेजमेंटस्तर्फे सर्व व्यवस्था करण्यात येते. यात जादूचे प्रयोग, बेबी शॉवर, गेम शो, थीम डेकोरेशन, गेट-टूगेदर पार्टीज् अशा विविध कार्यक्रमांचे परिपुर्ण नियोजन केले जाते. तसेच कार्यक्रमांसाठी सर्व सुविधांयुक्त हॉल किंवा लॉन उपलब्ध करुन दिला जातो.

जयपूर घागर्‍यासाठी श्रीश्री फॅशन
जयपूर येथील प्रसिध्द घागर, चुनरीसाठी श्री श्री फॅशनला पर्याय नसून जळगाव शहरात केवळ श्री श्री फॅशन येथेच जयपूर येथील घागरा उपलब्ध असल्याचे रंजना हसवाल यांनी सांगितले. तसेच साड्यांमध्ये जॉर्जेट, शिफॉन आदी साड्यांसह कलकत्ता साडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच लग्नसमारंभासाठी सौदर्यप्रसाधनांवर 20 टक्के सुट देण्यात आली आहे.

रोजमेरीत 50 टक्क्यांपर्यंत सुट
महिलांचे सौदर्य फुलविण्यासाठी रोजमेरी मेकअप स्टुडीओत तज्ञ आर्टीस्टद्वारे मेकअप केला जात असून 5 ते 50 टक्क्यांपर्यंत आकर्षक सुट देण्यात येत आहे. यात एक वर्षाच्या ब्राउशर गॅरंटीसह ब्रायडल मेकअप, एचडी, थ्रीडी मेकअप करण्यात येतात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सौदर्य प्रसाधनांचा वापर करण्यात येत असून बाहेरगावी जाऊन मेकअपची सुविधा पुरविण्यात येत असते.

अविस्मरणीय क्षणांची आठवण ‘बंधन’
जीवनातील अविस्मरणीय क्षणांची आठवणी टिपण्यासाठी बंधन प्रॉडक्शनतर्फे अत्याधुनिक कॅमेर्‍यांच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओग्राफीची सुविधा पुरविण्यात येते. तसेच लघुचित्रपट, लग्नसमारंभाचे शुटींग केले जातात. फोटो अल्बममध्ये करिज्मा, कॅनव्हरल, मेगाबुक, वेलवेट, मेटॅलिक, सिल्व्हर, स्ट्रेक्चर, ग्लॉसी आदी प्रकार आहेत.

सौदर्य उपचारासाठी ‘अमृतधारा’
त्वचेच्या समस्या, केसांची गळती, पुरळ आदी समस्यांवर उपचार करुन महिलांचे सौदर्य उजळण्यासाठी अमृतधारा ब्युटी स्पा आणि वेलनेस सेंटरद्वारे विविध उपचार पध्दती केल्या जातात. यात विशेष म्हणजे संपुर्ण आयुर्वेदीक औषधींचा वापर केला जात असून फेस पॅक, साबण, लिप बाम, फेस वॉश आदी आयुर्वेदीक उत्पादनांची निर्मिती देखील करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!