पाणीटंचाईची स्थिती होणार आणखी गडद

मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्येच; 69 गावांना 47 टँकरद्वारे पाणीपुरवठा

0
जळगाव । जिल्ह्यात यंदा झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे पाणी टंचाईच्या भीषण समस्येला जिल्ंहावासीयांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवडयात जिल्हयातील 69 गावांना 47 टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर जिल्हयातील सर्व मोठे जलाशय, धरणांमध्ये फक्त 30 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

यंदा जिल्हयात सरासरी 67 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची परिस्थीती अत्यंत बिकट आहे. त्यातच यंदा उन्हाळा कडक राहण्याची शक्यता असल्याने पाणी प्रश्न आणखीनच गंभीर होणार आहे.

65 कोटींचा टंचाई आराखडा
जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 65 कोटी रूपयांचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे. त्यातून 161 गावांना 166 विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. तर 41 ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

तालुकानिहाय टँकर
जळगाव – 1
जामनेर -2
धरणगाव -0
एरंडोल-0
भुसावळ-6
यावल-0
रावेर-0
मुक्ताईनगर-1
बोदवड-0
पाचोरा-0
चाळीसगाव-15
भडगाव-0
अमळनेर -16
पारोळा-6
चोपडा -0

LEAVE A REPLY

*