वाकोद येथे गॅसचा भडका : दोन महिलांचा मृत्यू

0
वाकोद, ता.जामनेर । दि.3 । वार्ताहर-घरगुती गॅसचा भडका झाल्याने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. दोघींना जखमी अवस्थेत जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
वाकोद येथील जैन फार्म परिसरात असलेल्या वस्तीतील रहिवाशी दाभाडे यांच्या कुटुंबियांकड़े गुरुवारी उपवास असल्याने संध्याकाळी 7 वाजता गॅसवर भगर शिजवत असतांना अचानक गॅसने मोठा भडका घेतला.

यात गॅसच्या प्रचंड भडक्याने दाभाडे कुटुंबातील सुरेखा गजानन दाभाडे (40) व गजानन दाभाडे यांची आत्या गयाबाई केशव देशमुख (80) या भाजल्याने गंभीर जखमी झाल्या.

घटनेची माहीती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

भाजीपाला विकुन उदरनिर्वाह- गजानन व सुरेखा हे दोघे ठिकठिकाणी गावी आठवडे बाजारात जावून भाजीपाला विक्री करून आपला व कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवित होते.

सुरेखा या स्वतःची शेतीही सांभाळत होत्या. सुरेखा यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासु, सासरे असा परिवार आहे.

 

LEAVE A REPLY

*