Type to search

Breaking News जळगाव विधानसभा निवडणूक २०१९

जळगाव : मतदान यंत्रासह कर्मचारी रवाना

Share

जळगाव (प्रतिनिधी) –

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदान प्रकियेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आज रविवार सकाळीच 7 वाजेपासूनच शहरासह जिल्हयातील अकरा विधानसभा मतदार क्षेत्रातील मुख्यालयी मतदान कामी नियुक्त कर्मचारी अधिकारी उपस्थित झाले होते.

त्या अधिकारी कर्मचार्‍यांना नियुक्त मतदान केंद्रावर विहीत वेळेत मतदान साहित्य वाटप करण्यात येवून मतदान केंद्रांवर रवाना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्हयात 11 विधानसभा क्षेत्रात 3532 मतदान केंद्र आहेत. या मतदान प्रकियेसाठी केंद्रावर 16100 अधिकारी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना बुथ निहाय मतदान साहित्याचे वाटप करण्यात येवून मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले.

मतदान केंद्रावर मतदान साहित्य पोचवण्यासाठी व परत आणण्यासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय परीवहन महामंडळाच्या बसेस वाहन चालकांची देखिल व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्हयात विधानसभा क्षेत्र – 11

मतदान केंद्रांची संख्या -3532 

नियुक्त कर्मचारी -16100

अतिदूर्गम भागातील मतदान केंद्र -11

मतदान यंत्रे बॅलट युनिट -6513

कंट्रोल युनिट – 4430

व्हिव्हीपॅट युनिट – 4882

असे मतदान साहित्य व कर्मचारी अधिकारी मनुष्यबळ जिल्ह्यातील मतदान केंद्रनिहाय बुथवर रवाना करण्यात आले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!