बाप्पा, मनपावरील विघ्न दूर कर!

0

डॉ. गोपी सोरडे- 9552576242
जळगाव शहर महानगरपालिकेवर गेल्या काही वर्षापासुन विघ्न आले. त्यामुळे आर्थिक संकटांना सामना करावा लागत आहे. परिणामी जळगावकर विकासकामांपासुन वंचित राहिले आहेत. बाप्पा अर्थात विघ्नहर्ता गणरायाचे तिन दिवसानंतर आगमन होणार आहे. विघ्नहर्त्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे.

जळगावात महानगरपालिकेचा मानाचा गणपती असतो. त्या अनुषंगाने प्रशासनानेही तयारी सुरु केली आहे. प्रतिष्ठापनेनंतर विघ्न दुर करण्यासाठी 10 दिवस मनोभावे आराधना केली जाणार आहे. त्यामुळे बाप्पा आता महानगरपालिकेवरील असलेले विघ्न दुर कर आणि जळगाव शहराचा कायापालाट होवू दे, ऐवढंच आता मागणं आहे.

जळगाव महानगरपालिकेवर गेल्या काही वर्षांपासुन संकटं येवू लागली आहेत. किंबहूना संकटांची मालिकाच सुरु झाली आहे. तत्कालीन जळगाव नगरपालिकेने घरकुलसह विविध योजनांसाठी हुडकोकडून कर्ज घेतले. मधल्याकाळात कर्जाचे हप्ते थकल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला आहे. कर्जापेक्षा व्याज अधिक अशी काहीशी परिस्थिती महानगरपालिकेवर ओढवली आहे. सध्या दरमहा हुडकोला 3 कोटी आणि जेडीसीसीला 1 कोटी असे 4 कोटी कर्जाचा हप्ता अदा केला जातो. परिणामी महानगरपालिकेला भार सोसावा लागत आहे. कारण उत्पन्न कमी आणि खर्च जादा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांचे,

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे दोन-दोन महिने पगार होत नाही. मुलभुत सुविधा उपलब्ध होत नाही. विकासकामे थांबली आहेत. रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. अशा परिस्थितीतही सोशिक जळगावकर सहन करु लागले आहे. कर्ज हे केवळ मनपावरील एकच संकट नाही. तर असे अनेक संकटं आली आहेत. गाळ्यांचा प्रश्न गेल्या सहा वर्षापासुन प्रलंबित आहेत. कोट्यावधी रुपयाचे भाडे गाळेधारकांकडे थकीत आहेत. त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 25 कोटीच्या निधीतुन अद्यापही कामे केली गेली नाहीत. 3 वर्षापासुन 25 कोटीच्या निधीसाठी वारंवार विघ्न येत आहेत. शासनाकडून उपलब्ध होणार्‍या निधीला देखील या-ना-त्या कारणामुळे विघ्न येवू लागले आहे. पण आता महानगरपालिकेवरील सर्व विघ्न दुर होतील, अशी अपेक्षा आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. सत्ता येताच शहराच्या विकासासाठी 100 कोटीचा निधी मंजुर झाला आहे. यावरुन विघ्न दुर होईल. असे वाटु लागले आहे. हुडकोच्या एकरकमी कर्जाची फेड, गाळ्यांचा प्रलंबित असलेला प्रश्न, जळगाव शहरातील थांबलेला विकास हे सर्व विघ्न दुर होईल. अशी निश्चितच अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

*