Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव विधानसभा निवडणूक २०१९

लोकशाहीचा महाउत्सव : मतदानासाठी बुथवर रांगा

Share

जळगाव –

महाउत्सव म्हणून उल्लेख करण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ७ वाजेपासून सुरूवात झाली. नवमतदारांमध्ये या महाउत्सवात सहभागी होण्यासाठी चढाओढ पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मात्र दरवेळी निवडणुकीत कानी पडणाऱ्या सामान्यत: जुन्याच तक्रारींचा पाढाही पहायला मिळत आहे.

प्रशासनातर्फे निवडणुकी संदर्भात सर्वोतोपरी काळजी घेतली असून मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडावे म्हणून, कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

जळगाव शहरात मतदानाचा शुभारंभ

जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील ३९४ मतदार केंद्रांवर मतदानास सकाळी ७ वाजेपासून प्रारंभ झाला.

यांनी बजावला मतदानाचा हक्का

आ.राजूमामा भोळे, महापौर सौ.सिमा भोळे
यात महायुतीचे उमेदवार आ.राजूमामा भोळे व त्यांच्या सौभाग्यवती महापौर सौ.सिमा भोळे यांनी प्रतापनगरातील प्राथ.शाळेत आपला मतदानाचा हक्का बजावला.

अभिषेक पाटील
राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी शहरातील रूस्तमजी हायस्कुल येथे मतदान केले.

जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी गणपती नगर मधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

उद्योगपती अशोक जैन, आ.चंदुलाल पटेल

जळगावचे प्रसिध्द उद्योगपती अशोक जैन व आ.चंदुलाल पटेल यांनी एम.जे.कॉलेज परशुराम विठोबा शाळेत मतदान केले.

सककाळी ७ ते १० वाजेपर्यंत असे झाले मतदान

चोपडा- ४.५० टक्के
रावेर – ६.७८
भुसावळ – ३.२५
जळगाव शहर – २.४९
जळगाव ग्रामीण- ११
अमळनेर ५.०६
एरंडोल – ९
चाळीसगाव – ९.५०
पाचोरा – ३.८४
जामनेर – ४.०८
मुक्ताईनगर – ७ टक्के मतदान झाले.

 

दिवसभरात मतदानाचे येणारे अपडेट आपण आमच्या साईडवर बघत रहा.

..

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!