Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जळगाव : ‘मी मतदान कराले चालनू, तुम्ही भी चला हो !’

Share

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करावे यासाठी राज्यभरात मोहीम हाती घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव येथे रांगोळी चित्र व खास अहिराणीच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन या राज्यातील नागरिकांना करण्यात येत आहे. यासाठी राजयोतील अनेक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून रांगोळी काढण्यात आली आहे. व्यक्तीची प्रतिकृती असून ‘मी मतदान कराले चालनू, तुम्ही भी चला हो !’ असे अहिराणीत मतदारांना आवाहन करण्यात आले आहे.

निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सरकारी आणि खासगी संस्थांकडून जनतेला विविध प्रकारे मतदानासाठी प्रेरित केले जात आहे. जाहिराती, स्ट्रीट प्ले, सेलिब्रिटींकडून आवाहन या मार्गे जनजागृती केली जाते. त्यामुळे देशातील लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचा असणारा मतदानाचा दिवस लक्षात घेता राज्यभरात अशा प्रकारे मतदानाचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!