पालेभाज्या भाववाढीचे चटके ऑगस्टपर्यत कायम

पाणीटंचाईचा परिणाम; पालेभाज्यांची आवक घटली; दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; आणखी वाढ शक्य

0
जळगाव । पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून त्याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. दोन ते तीन दिवसांपासून पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर भाववाढ झाली आहे. ऑगस्टपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची चिन्हे आहेत. भाववाढ ही पुर्णतः पावसावर अवलंबुन असून पाऊस न झाल्यास आणखी भाववाढीची भीषण परिस्थती उद्भवू शकते सध्यातरी पालेभाज्या सर्व सामान्यांच्या आवाक्या बाहेर दिसत आहे.

यांचे भाव आहेत स्थिर
बाजारपेठेत भाज्यांची भाववाढ झाली असलीतर काही भाज्यांनी मात्र दिलासा कायम ठेवला आहे. त्यात काटेरी वांगे- 20 ते 25 रुपये किलो, कोबी-20-30, पत्ता कोबी-20-30, मेथी-20-30, टमाटे-20-25, काकडी-20-25, बीट-20-25, गाजर-20-25, कोथिंबीर-20-30, दुधी भोपडा- 20-30

शहरात आजुबाजुच्या परिसरातून पालेभाज्यांची आवक होत असतांनाही भाववाढीची ही परिस्थिती आहे. आवक कमी झाल्यावर नाशिक, पुणे, मंचर, नारायणगाव, खंडवा, इंदौर, रतलाम येथुन पालेभाज्या येतात त्यांचे भाव अजुन वाढीव असेच असतील.
– बाळू पाटील,
भाजी विक्रेते

LEAVE A REPLY

*