Type to search

Breaking News जळगाव

वरणगाव येथे सेंट्रल बँकेत बंदुकीतून गोळी सुटल्याने चार जखमी

Share

वरणगाव (वार्ताहर)

येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आज दिनांक 20 रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान येथील सिक्युरिटी गार्ड यांच्या बंदुकीतून अनावधानाने फायरिंग झाल्याने 4 नागरिक जखमी झाले चौघांना सामान्य रुग्णालय जळगाव येथे हलवण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वरणगाव येथील बस स्टँड चौकात असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आज दिनांक 20 रोजी सकाळपासून मंगळवार बाजाराचा दिवस असल्याने परिसरातील खेड्यातील नागरिकांची गर्दी खूप होती. त्यामुळे बँकेचे सुरक्षा रक्षक लालचंद जनार्दन चौधरी हे बँकेच्या मुख्य दरवाजाजवळ उभे असताना बँकेत येणाऱ्या ग्राहकांना शिस्तीचे पालन करण्याचे सांगून आत सोडत होते. दुपारी दोनच्या वाजेच्या दरम्यान सुरक्षारक्षकाच्या बंदूकीच्या घोड्यामध्ये बंदुकीचा बेल्ट अटकल्याने बंदुकीची नडी जमिनीकडे करून अटकलेला बेल्ट काढण्याचा प्रयत्न करीत असताना बंदुकीचा घोडा अचानक दाबला गेल्याने बंदुकीतून एका गोळीची फायरिंग झाली. सदर गोळी बँकेतील खुर्च्यांवर रांगेत बसलेल्या नागरिकाच्या पायाला स्पर्श करून तर काहींच्या पायामध्ये घुसून आरपार निघून समोर असलेल्या काचा वर आदळून काच फुटला. यात प्रमिला वसंत लोहार (राहणार तळवेल), कमलाबाई सोपान चौधरी (राहणार वरणगाव), शोभा प्रकाश चौधरी (राहणार वरणगाव), राधेश्याम मोहनलाल जयस्वाल (राहणार वरणगाव) या चार नागरिकांना जबर मार लागल्याने त्यांना वरणगाव येथील भोईटे हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून सामान्य रुग्णालय जळगाव येथे हलवण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!