आकलन, लेखन, संवाद कौशल्य महत्त्वाचे – जाधव

0
जळगाव । दि.22 । प्रतिनिधी-सध्याच्या काळात स्पर्धा परिक्षेकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल आहे. स्पर्धा परिक्षेतून अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत रुजु होत आहे.
त्यामुळे स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी आकलन, लेखन व संवाद कौशल्य महत्वाचे असल्याचे प्रतिपादन द युनिक अ‍ॅकेडमीचे संस्थापक अध्यक्ष तथा लेखक तुकाराम जाधव यांनी केले.
द युनिक अ‍ॅकेडमी जळगाव शाखेतर्फे एमपीएससी व युपीएससी परिक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा पध्दतीचे नियोजन, अभ्यास प्रक्रिया, परिक्षेचे टप्पे याबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे कांताई सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दै. देशदूतचे संपादक हेमंत अलोने होते. यावेळी व्यासपीठावर युनिक अ‍ॅकेडमीचे सुनिल देशमुख, मिलिंद पाटील, सेवानिवृत्त प्राध्यापक सुनिल गरुड आदी उपस्थित होते.

सुरवातील सुनिल गरुड यांनी प्रशासकीय सेवेत सर्वाधिक मनुष्यबळ पुरविणारी युनिक अ‍ॅकेडमी आहे. युनिक अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून युपीएससी परिक्षेत मराठी माणसाचा टक्का वाढत असून शिक्षण उन्नतीसाठी युनिक अ‍ॅकेडमीचे सतत प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.

पुढे विद्यार्थ्यांना तुकाराम जाधव यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे टिप्स् विद्यार्थ्यांना दिल्या.

विद्यार्थ्यांनी सुरवातीला युपीएससी किंवा एमपीएससी यापैकी कुठले क्षेत्र निवडायचे आहे. याबाबत अगोदर मनाची तयारी करणे गरजचे आहे.

त्यानंतर या स्पर्धा परिक्षेत आपण यशस्वी होऊच असा निर्धार मनाशी बाळगाला पाहिजे. मनात आलेले नकारात्मक विचारांना अभ्यासाच्या मदतीने बाहेर काढायला हवे.

स्पर्धा परिक्षेत आपण पास होवू की नाही? यासारख्या विचारांनी आपली मानसिकता कमी होते. मनोधर्य, मानसिकता हया अभ्यासबाहय कौशल्याने नकारात्मक विचारांवर आपण मात करू शकतो असे जाधव यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांमध्ये चिकीत्सक विचार करण्याची वृत्ती असली पाहिजे. स्पर्धा परिक्षेची तयारी करतांना परिक्षेचा अभ्यासक्रम, परिक्षेचे स्वरुप विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पाहिजे.

तसेच आयोगाने दिलेला अभ्यासक्रम समजून घेणे, तसेच विद्यार्थ्यांनी जुन्या प्रश्नपात्रिकांचा अभ्यास करून स्वताचा प्रश्नसंच तयार करावा, संदर्भ पुस्तके, पाठपुस्तके, एनसीआरटीची पुस्तके वाचून यातील संकल्पना स्पष्ट करून घेतल्या पाहिजे.

याशिवाय विद्यार्थी परिक्षेत यशस्वी होवू शकणार नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याने पाठपुस्तकांसह, वर्तमानपत्र, मासिकांमधील चालु घडामोडी वाचल्या पाहिजे.

तसेच परिक्षेच्या वेळाप्रमाणे उजळणीसाठी विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. स्पर्धा परिक्षेती अचुकतेसाठी उजळणी महत्वाची असल्याचेही तुकाराम जाधव यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुत्रसंचालन गोपाल सैंदाणे यांनी केले.

 

 

LEAVE A REPLY

*