ट्रकच्या धडकेत रेमंड कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू

ओव्हरटेकच्या प्रयत्नात गोदावरी महाविद्यालयाजवळ घडली घटना

0
जळगाव । गोदावरी महाविद्यालय एमईसीबीच्या ऑफिसजवळ भुसावळकडून जळगावकडे येणार्‍या भरधाव आयशरने ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकीस्वारांना उडविल्याने झालेल्या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या रेमंड कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमरास घडली. दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. तुषार भागवत पाटील वय 30 रा. जळगाव खुर्द असे मयताचे नाव आहे.

तुषार हा गेल्या सहा ते सात वर्षापासून रेमंड मधील न्यू व्हिविंग विभागात कार्यरत होता. रविवारी सुट्टी असतांना तुषार व त्यांचा मित्र दिलीप गोपाळ पाटील हे दोघे एमएमच 19 के 3588 क्रमांकाच्या दुचाकीने कामानिमित्त भुसावळ येथे जात होते. तर भुसावळ येथून जळगावकडे येत असलेल्या भरधाव आयशरने ओव्हरटेकच्या प्रयत्नात गोदावरी महाविद्यालयापासून काही अंतरावर तुषार याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तुषार याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवित असलेल्या दिलीप पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघांनाही नागरिकांच्या मदतीने जवळच असलेल्या गोदावरी हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणीअंती तुषार याला मयत घोषित केले. पोलीसांनी नागरिकांच्या मदतीने ट्रक ताब्यात घेतला. नाशिराबाद पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश हिवरकर यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

तुषारवर होती कुटुंबाची जबाबदारी
तुषारचे वडील भागवत पाटील यांचेही निधन झाले असल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी तुषारवर होती. त्याच्या पश्चात आई व लहान भाऊ मुकेश आहे. तुषारची आई देवदर्शनासाठी जात असल्याने तो मित्र दिलीपसोबत खाजगी कामानिमित्त भुसावळ येथे जात होता. तुषार हा दिव्यांग असल्याने तीन महिन्यांपूर्वीच त्याचा पायावर शस्त्रक्रिया झाली होती.

LEAVE A REPLY

*