जिल्ह्यात पहिल्याच दिवशी एक लाख 72 हजार वृक्षांची लागवड

0
जळगाव । दि.1 । प्रतिनिधी-चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमास आज संपूर्ण जिल्हयात ठिकठिकाणी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या कार्यक्रमातंर्गत जिल्हयात 1 लाख 72 हजार 251 वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी दिली.

वनविभागामार्फत जिल्ह्यातील वृक्ष लागवडीची माहिती दिवसातून तीन वेळा जमा करण्यात येत असून यासाठी वन विभागाने स्वतंत्र संगणक यंत्रणा कार्यरत केली आहे. या यंत्रणेमार्फत संपूर्ण जिल्हयातील वृक्ष लागवडीची माहिती सकाळी दहा, दुपारी दोन व सांयकाळी सहा वाजता घेऊन ती मंत्रालयास कळविण्यात येत आहे.

जिल्ह्यात ही मोहिम जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे व नियोजनबध्दरित्या राबविण्यात येत असल्याने पहिल्याच दिवशी सांयकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात 1 लाख 72 हजार 251 वृक्ष लागवड झाल्याची माहिती वन विभागातर्फे देण्यात आली.

 

 

 

LEAVE A REPLY

*