Type to search

जळगाव फिचर्स

जिल्ह्यातील 20 न्यायाधीशांच्या बदल्या

Share
नोकरीत आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही : सर्वोच्च न्यायालय, Latest News Job Reservations No Right High Court Order

भुसावळ

जिल्हा आणि जिल्ह्यातील विविध तालुकास्तरावर कार्यरत असलेल्या 20 न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नुकत्याच निघालेल्या आदेशान्वये बदली करण्यात आलेली आहे. बदली झालेल्या सर्व न्यायाधीशांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे आवश्यक आहे. राज्यातील मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार जिल्ह्या मुख्यालयी तसेच जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी 20 न्यायाधीशांची कार्यालयीन बदली करण्यात आली आहे.

बदली झालेल्या न्यायाधीशांची नावे, सध्या नियुक्तीचे ठिकाण, बदली झालेले ठिकाण पुढील प्रमाणे – श्रीमती ए.एस. भासरकर, चाळीसगाव, वाशी, जि.ठाणे. श्रीमती आर.एस. शेख, जळगाव, सहकार न्यायालय अलिबाग, जि. रायगड. एस.ए. सरदार, मुक्ताईनगर, अलिबाग जि. रायगड. जी.जी. कांबळे, जळगाव, मुर्तिजापूर, जि. अकोला. श्रीमती एम.वाय. नेमाडे, जळगाव, वर्धा. एस.सी. हवेलीकर, जामनेर, वाशी, जि.ठाणे. डी.जी. जगताप, यावल, भिमापूर, जि. नागपूर. श्रीमती आर.डी. सिदानाले, जळगाव, परभणी. एन.एम. बंडगर, एरंडोल, मिरज, जि.सांगली. ए.ए.कुलकर्णी, जामनेर, राधानगरी, जि. कोल्हापूर. पी.बी. पळसपगार, चोपडा, नागपूर. सी.यू. तेलगावकर, जळगाव, परभणी. एच.एच.एच. मुजाहेदुल, पाचोरा, कारंजा, जि. वाशीम. श्रीमती एस.वाय. सूल भुसावळ, कल्याण जि. ठाणे. श्रीमती पी. बी. चिदरे, भुसावळ, वाशी, जि. ठाणे. आर.एस. मानकर, भुसावळ, मंगळूरपीर, जि. वाशीम. वाय.जे. वळवी, अमळनेर, डहाणू जि. पालघर. आर. एल. राठोड, रावेर, आर्वी, जि. वर्धा. जी.एस. बडगूजर, पाचोरा, मालेगाव, जि. वाशीम. डी.बी. साठे, जळगाव, पुसद, जि. यवतमाळ.

जिल्ह्यात नव्याने रुजू होणारे 17 न्यायाधीश-

सध्या नियुक्तीचे ठिकाण, बदली झालेले ठिकाण पुढील प्रमाणे- श्रीमती सुवर्णा ए. कुळकर्णी, बिलोली, जि. नांदेड, जळगाव. आर.एन. डांगे, कोल्हापूर, सहकार न्यायालय जळगाव. एस.व्ही. पवार, सोलापूर, जळगाव. आर.वाय. खंडारे, जिंतूर, जि. परभणी, जळगाव. डी.बी. डोमाळे, बीड, भुसावळ. श्रीमती एस.एस. ओसवाल, वर्धा-भुसावळ. जी. ओ. वानखेडे, केळापूर, जि. यवतमाळ-मुक्ताईनगर. एल. व्ही. श्रीखंडे,आमगाव, जि. गोंदिया-पाचोरा. व्ही.एस. धोंडगे, खालापूर, जि. रायगड-एरंडोल. श्रीमती आर.एम. थावरे, दारव्हा, जि. यवतमाळ-सहाय्यक धर्मदाय आयुक्त जळगाव. के. एस. खंडारे, नागभीड, जि.चंद्रपूर-भुसावळ. ए.एच. बजाड, पुसद, जि. यवतमाळ-रावेर. व्ही.एम. डांमरे, भिवापूर, जि. नागपूर-यावल. श्रीमती एस.व्ही. चारडे, अमरावती-जळगाव. डी.एन. चामळे, मुदखेड, जि. नांदेड, जामनेर. आर.एन. दांडगे, कोल्हापूर-सहकार न्यायालय, जळगाव. ए.एच. शेख, सांगोला, जि. सोलापूर-चाळीसगाव.

याप्रमाणे न्यायाधीशांच्या बदली व नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या अमळनेर, चोपडा व जामनेर येथील एक न्यायाधीशांचे पद रिक्त असल्याचे परिपत्रकावरील नियुक्ती ठिकाणावरुन समजते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!