धावत्या रेल्वेतून पडून मुंबईच्या तरुणाचा मृत्यू

0
जळगाव । शहरातील हरिविठ्ठल नगराजवळील रेल्वेरुळावर धावत्या रेल्वेतून पडून मुंबईच्या तरुणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या तरुणाच्या खिश्यात मिळून आलेल्या कागदपत्रांवरून या तरुणाची ओळख पटविण्यास पोलिसांना मदत झाली. परंतू मयत तरुण उत्तर प्रदेश येथील मुळ रहिवाशी असल्याने त्यांच्या कुटुंबियांपर्यंत माहिती पोहचविण्यास पोलिसांना अडचणी येत आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हरिविठ्ठल नगरातील अप रेल्वेलाईनवरील खांबा क्रमांक 416/ 4-6 दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने रात्री 9.25 वाजेचया सुमारास एक तरुण याठिकाणी मयत अवस्थेत पडल्याचे गॅगमनला दिसून आले. त्याने याबाबत उपस्टेशनप्रबंधकांना माहिती माहिती दिली. त्यानंतर उपस्टेशनप्रबंधक यांनी या घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना दिली. घटनेची माहिती कळताच पोलिस कर्मचारी अनिल फेगडे यांनी याठिकाणी धाव घेतली. मयत तरुणाच्या खिश्यात मिळून आलेले पॅनकार्ड व ड्राव्हिंग लायसन्सवरून त्याचे नाव संतोषकुमार कन्हैयालाल राजभार वय 30 रा. केईएम, शानबाग, मनोर, अंधेरी(ईस्ट), मुंबई असे असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतू संतोषकुमार राजभार हा मुळ उत्तर प्रदेशातील रहिवाशी असल्याने त्यांच्याकुटुंबियांपर्यत माहिती पाठविण्यास अडचणी निर्माण झाल्या आहे. याबाबत उपस्टेशन प्रबंधक यांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ. अनिल फेगडे करीत आहे.

रेल्वेतून पडल्याने प्रवासी जखमी
गुवाहटी- लोकमान्य टिळक एक्सप्रेसमधून भुसावळजवळ धावत्या रेल्वतून पडल्याने आसाम येथील प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. राजन मुंढा वय 27 असे या जखमी प्रवाश्याचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेल्या सहकार्‍यांनी लागलीच भुसावळ रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर जखमी राजन याला उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*