जिल्ह्यात केवळ पाच वाघांचे अस्तित्व

0
जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा जंगल क्षेत्रात पाच वाघ व दोन बछड्यांचे अस्तित्व असल्याची माहिती उपवनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
जळगाव आणि यावल वनविभागातर्फे उद्या दि. 29 रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जात आहे. यापार्श्वभूमिवर जळगाव उपवनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी यांनी सांगितले की, वढोदा जंगल क्षेत्रात चार वाघांचे अस्तित्व आहे.

त्यांच्या संरक्षणासाठी वढोदा वनक्षेत्रातील 12 हजार हेक्टर संरक्षीत वनक्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. याठिकाणी मानवी हस्तक्षेप होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जागतिक व्याघ्र दिनानिमीत्त जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वनविभागातर्फे रॅली
जागतिक व्याघ्र दिनानिमीत्त जळगाव आणि यावल वनविभागातर्फे आज रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन सहाय्यक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी उपवन संरक्षक आदर्श रेड्डी, यावल उपवनसंरक्षक एस.एस. दहीवले, सहायक उपवन संरक्षक डी. आर. पाटील , ए.एन.पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ, पर्यावरण शाळेच्या चेतना नन्नवरे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर, वन्यजीव प्रेमी भीमराव सोनवणे उपस्थित होते.  भुसावळ हायस्कुल स्कूल मध्ये अर्जुना संस्थेतर्फे व्याघ्र दूतांचे सुस्वागतम कार्यक्रम,पथनाट्य झाले त्या वेळी शाळेतील 800 विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

उद्या दि. 29 रोजी भवानी तलाव येथून खा.रक्षा खडसे यांच्या हस्ते उपस्थितीत चारठाणा येथे पथनाट्य, त्या नंतर प्रत्येक गावात मानव वन्यजीव संघर्ष या विषयावर जनजागृती पत्रकांचे वितरण, पथनाट्य, सायंकाळी 6:30 वा.जळगाव वनविभाग कार्यालयात आ.राजूमामा भोळे,प्रसाद बापू हिरे,यांच्या हस्ते समारोप होईल.

 

LEAVE A REPLY

*